बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते खूप जवळचे आहे. प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगमध्येच याचे उदाहरण पाहायला मिळते. आयपीएलमध्ये बॉलिवूड कलाकार शाहरुख खान (कोलकाता नाईट रायडर्स) आणि प्रीती झिंटा (किंग्स इलेव्हन पंजाब) यांच्यासारख्या बॉलिवूड सिताऱ्यांनी संघ विकत घेतले आहेत. आता या यादीत सलमान खानचेही नाव जोडले गेले आहे. मात्र सलमानने आयपीएलचा नव्हे, तर लंका प्रिमियर लीगचा संघ विकत घेतला आहे.
सलमान खानच्या कुटुंबाने घेतला विकत संघ
२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० दरम्यान लंका प्रीमियर लीग (एलपीएल) २०२० खेळली जाणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमानचा भाऊ सोहेल खान आणि वडील सलीम खान यांची कंपनी सोहेल खान इंटरनॅशनलने एलएसएलमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी कॅंडी टस्कर्स हा संघ विकत घेतला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना सोहेल म्हणाला की, “आमच्या संघात एकाहून एक जबरदस्त खेळाडू उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे आमचा संघ इतर संघापेक्षा उत्कृष्ट बनतो. आम्हाला संघातील खेळाडूंमध्ये खूप क्षमता दिसून येते. तसेच आमच्या संघात युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आहे. त्यामुळे मी त्याला खेळताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसेच यावर्षीचे सर्व सामने पाहण्यासाठी सलमान स्वत: श्रीलंकेला जाणार आहे.”
पाकिस्तानी खेळाडूचा संघात समावेश
एलएसएलच्या कँडी टस्कर्स संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. गेलला सोडून कुशल परेरा, लियाम प्लंकेट, कुसल मेंडिस आणि नुआन प्रदीपसारखे स्टार खेळाडू उपलब्ध आहेत. तसेच वहाब रियाज हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजही सलमानच्या संघाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानचा डेविड मिलर बनला डीडीएलजेचा ‘शाहरुख खान’, फोटो होतायेत व्हायरल
एकेकाळी आयसीसीने बॅन केलेला खेळाडू आता ठरलाय आयपीएल २०२०चा ‘मॅच विनर’
‘एक तर तुम्ही जिंकता किंवा काहीतरी शिकता,’ दिग्गजाने केली धोनीची प्रशंसा
ट्रेंडिंग लेख-
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
नेमकं चाललंय तरी काय! करोडो रुपये देऊन संघात घेतलेले खेळाडूच ठरले सपशेल फ्लॉप
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू