पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळत असताना इम्रान ड्रग्स घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, माझ्यासोबत इतर व्यक्तींनीही इम्रान यांना ड्रग्स घेताना पाहिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माझ्या घरी घेतले होते ड्रग्स
सरफराज नवाज म्हणाले की, “१९८७ साली जेव्हा पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा संघाचे प्रदर्शन अत्यंत वाईट राहिले होते. त्यातही इम्रान यांनाही चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. त्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यावरुन मायदेशात परतल्यावर इम्रान जेवणासाठी माझ्या घरी आले होते. त्यांच्यासोबत आमचे संघसहकारी मोहसीन खान, सलीम मलिक आणि अब्दुल कादिर हेदेखील होते. त्यावेळी जेवण झाल्यानंतर इम्रान यांनी चरसचे सेवन केले होते. तसेच, त्यांनी कोकिनही घेतले होते.”
आमना- सामना करण्यास तयार
सरफराज यांनी पुढे म्हटले की, “मी इम्रान यांना लंडनमध्ये असतानाही ड्रग्स घेताना पाहिले होते. मी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे. तुम्ही माझ्यासमोर त्यांना घेऊन या, तेव्हा पाहू ते या गोष्टीला खोटे कसे ठरवतात. इम्रान ड्रग्स घेतात याचा मी एकटाच साक्षीदार नाही. लंडनमध्येही बऱ्याच लोकांना हे माहिती आहे.”
महत्त्वाचे म्हणजे, इम्रान यांच्यावर ड्रग्स प्रकरणी आरोप करण्यात येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी इम्रान यांची पहिली पत्नी रेहम खान यांनीही त्यांच्यावर आरोप लगावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
विश्वविजेते कर्णधार इम्रान खान हे यांना जगातील सार्वकालिन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जाते. त्यांनी १७५ वनडे सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. दरम्यान त्यांनी ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या होत्या. तर ८८ कसोटी सामन्यात ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्सची कामगिरी केली होती.
‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत
…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा
विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!
ट्रेंडिंग लेख-
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर






