नवी दिल्ली। दोन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ सततच्या पराभवानंतर हळू-हळू विजयाच्या मार्गावर येत आहे. अशातच कोलकाता संघ व्यवस्थापनाने चाहत्यांसाठी एक खास भेट दिली आहे. त्यांनी नुकतेच एक एँथम लाँच केले आहे. या खास एँथममध्ये संघमालक आणि दिग्गज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानही दिसत आहे.
या एँथमचे टायटल ‘लफाओ’ आहे. याचा बंगाली अर्थ ‘उडी मारणे’ असा होतो. या एँथम व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
शाहरुख खानने लाँच केले फॅन एँथम
शाहरुख खानने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत या एँथमबद्दल चाहत्यांना सांगितले. कोलकाताच्या या नवीन एँथम गाण्याला रॅपर बादशाहने आवाज दिला आहे. शाहरुखने बादशाहला संपूर्ण संघाकडून एँथमला आपला आवाज देण्यासाठी धन्यवाद दिला आहे.
The @KKRiders and I are unveiling the most awaited anthem of the season! Our FAN anthem – #Laphao! LIVE! Come join us! An Anthem for, by & of the fans. Because we miss you!!
Big thank you to @Its_Badshah for the very unique and catchy track… https://t.co/djZXGjJGtC
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 20, 2020
शाहरुखने फेसबुक लाईव्ह येत नवीन फॅन एँथम गाणे लाँच केले. ज्यावेळी शाहरुख कोलकाताच्या फेसबुकवरून लाईव्ह आला होता, त्यावेळी कोलकाताचे दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, ऑयन मॉर्गन, शुबमन गिल आणि शिवम मावीसारखे युवा खेळाडूही उपस्थित होते.
The King of Bollywood, the Knights of IPL, and the Badshah of music have come together to #LAPHAO with all our fans! 😍
Come join them and tag us in your videos too!@iamsrk @RedChilliesEnt @Its_Badshah #KKRHaiTaiyaar #TuFanNahiToofanHai #Dream11IPL pic.twitter.com/ZPLiSUl40r
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 20, 2020
शाहरुखच्या या व्हिडिओमध्ये त्याच्या हेअरस्टाईलपासून लूकपर्यंत अनेक चर्चा होत आहेत. सोबतच त्याच्या चाहत्यांनाही त्याचा हा अंदाज चांगलाच आवडला आहे. गाण्यात सामाजिक अंतर पाळण्याचा संदेश दिला आहे.
गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान
आयपीएल २०२० च्या हंगामात कोलकाता संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सोबतच १० गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल ४ क्रमांकामध्ये सामील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : आज बेंगलोर-कोलकाता येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
-कोलकाता नाईट रायडर्सला यावेळी आयपीएलमध्ये जाणवणार ‘या’ गोष्टीची सर्वाधिक कमी
-सगळे परवडले पण ‘हा’ नको! अश्विनच्या फिरकीपुढे ‘युनिव्हर्सल बाॅस’चा थरथराट!
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
–अशा ५ घटना, जेव्हा ‘मुलतानचा सुलतान’ नडलाय थेट पाकिस्तानी खेळाडूंना