भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे गुरुवारपासून (१७ डिसेंबर) खेळला जात आहे. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येतो. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने गुलाबी चेंडूबद्दल मोठे विधान केले आहे.
सर्व कसोटी सामन्यात लाल चेंडू ऐवजी गुलाबी चेंडूचा वापर केला जावा, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, लाल चेंडूने गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नाही.
प्रत्येक कसोटी सामन्यात गुलाबी चेंडू वापरावा
शेन वॉर्न म्हणाला, “मी मागील काही वर्षापासून म्हणत आलो आहे की, माझे म्हणणे आहे की सर्व कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जावा. सामन्यात गुलाबी चेंडू दिसायला सोपे जाते, आणि प्रेक्षक सुद्धा पाहू शकतात. हा चेंडू टीव्हीवरही चांगल्या प्रकारे दिसतो. यासाठी नेहमी गुलाबी चेंडूचा वापर करायला हवा.”
गुलाबी चेंडू 60 षटकांनंतर मऊ होतो
“तसेच 60 षटकांनंतर या चेंडूला बदलला जावू शकतो. कारण तो मऊ होतो. मला वाटते प्रत्येक कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जावा. लाल चेंडू स्विंग होत नाही. याने कोणतीही मदत मिळत नाही आणि 25 षटकांनंतर हा नरम होतो. इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूला सोडून बाकी सर्व चेंडू खास नाहीत.”
दिवसाअखेर भारताची धावसंख्या ६ बाद २३३ अशी राहिली. यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या, तर अजिंक्य रहाणे (४२) आणि चेतेश्वर पुजाराने (४३) धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल