---Advertisement---

ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 7:33 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला टी-20 मालिका जिंकून देण्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय संघ आताही ऑस्ट्रेलियात आहे आणि तेथे कसोटी मालिका खेळत आहे. मात्र, या कसोटी संघात पंड्याची निवड न झाल्याने तो मायदेशी परतला आहे. आपल्या मुलाला चार महिन्यांनंतर भेटल्यावर हार्दिक पंड्या खूपच भावनिक झाला होता. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. आता हार्दिक आपला मुलगा अगस्त्य आणि पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक सोबत वेळ घालवत आहे. यादरम्यान हार्दिक आणि नताशा यांचे डिनर डेटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतेच नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामधे हार्दिक आणि नताशा एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे. नताशाने हार्दिकचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना लिहले आहे, ‘माय डिनर डेट.’ नताशाच्या या पोस्टला हार्दिकने आपल्या स्टोरीवर शेअर केले आहे.

हार्दिक अगस्त्यच्या जन्मानंतर लगेच एक महिन्याने आयपीएल खेळण्यासाठी दुबईला निघून गेला होता. जिथे तो पाचव्यांदा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्यांच्यानंतर हार्दिक ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे आणि टी-20 भारतीय संघाचा सदस्य होता.

https://www.instagram.com/p/CI3BTTjAsjY/?igshid=1xuxms4buh8ud

मात्र, भारतीय संघ वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत झाला, तर टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. जामध्ये हार्दिक पंड्याचे मोलाचे योगदान होते. वनडे मालिकेत त्याने ३ सामने खेळताना १०५ च्या सरासरीने २१० धावा केल्या. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त टी२० मालिकेत पंड्याने चमकदार कामगिरी केली. त्याने ३ सामने खेळताना ३९ च्या सरासरीने ७८ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

डेविड वॉर्नरचा हृतिक रोशनच्या अवतारातील ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच…!! तुम्हीही रोखू शकणार नाही हसू

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---