---Advertisement---

एका भारतीय व्यक्तीलाच आयपीएल होऊ नये अशी इच्छा होती, पहा कुणी केलाय हा आरोप

On: शुक्रवार, जुलै 24, 2020 4:50 PM
---Advertisement---

आयसीसीने याच आठवड्यात अनेक बैठकांनंतर यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषक कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने हा निर्णय घेण्याआधीच यजमान ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक आयोजित करण्यासाठी असमर्थ असल्याचे सुचित केले होते. परंतू त्यानंतरही आयसीसीने अंतिम निर्णय घेण्यासाठी काही कालावधी जाऊ दिला. याबद्दल पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बसित अलीने एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना यंदा आयपीएल आयोजित करण्याची इच्छा नव्हती.

यावर्षी 29 मार्चपासून आयपीएल 2020 ला सुरुवात होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआय हा मोसमत सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान आयपीएलचा हा मोसम आयोजित करण्याचा विचार करत होते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी20 विश्वचषक खेळवला जावा की नाही या आयसीसीच्या निर्णयावर आयपीएलचे आयोजन अवलंबून होते.

यावेळी आयसीसीने टी20 विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय देण्यासाठी उशीर करण्याबद्दल बसित अली यांनी म्हटले की विश्वचषकाला पुढे ढकलण्याचा निर्णय एक ते दीड महिन्यापूर्वीच घ्यायला हवा होता. परंतू शशांक मनोहर यांनी मुद्दामहून यासाठी उशीर लावला. स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर बोलताना अली म्हणाले, ‘हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते की शशांक मनोहर यांची ही युक्ती होती, नाहीतर विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय एक-दीड महिन्याआधीच झाला असता. शशांक मनोहर यांनी मुद्दाम विलंब केला. कदाचित भारतीय प्रेक्षकांना हे ऐकून वाईट वाटले असेल, तर माफ करा. पण हे माझे मत आहे.’

तसेच ते म्हणाले, ‘सोशल मीडिया आणि वाहिन्यांवर अशी चर्चा आहे की बीसीसीआयच्या दबावाखाली आयसीसीने टी20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबद्दल विचारण्यासाठी अगदी मला कॉलही आले पण मी उत्तर देण्यास नकार दिला. वास्तविक, आयसीसीच्या बैठकीत काय घडले हे लोकांना माहिती नाही. टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार नाही, असे आधीच ठरलेले होते.’

मागील काही काळापासून शशांक मनोहर आणि बीसीसीआय यांचे संबंध बिघडले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लवकरच आयसीसी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी निवडणूक घेईल.

तसेच आयसीसीने आता टी20 विश्वचषक अखेर पुढे ढकलला असल्याने आयपीएल 2020 चा मोसम 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये होणार असल्याची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

आता भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात, होऊ शकतो वेळापत्रकात मोठा बदल

त्या एका ट्विटमुळे मॉर्ने मॉर्केलच्या निधनाची पसरली अफवा

आनंदाची बातमी! १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आयपीएल २०२०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---