नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील 47 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. दिल्लीचा सलामीवीर वृद्धिमान साहा याने या सामन्यात तुफान फटकेबाजी करत 87 धावा केल्या. या खेळीमुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याचा उल्लेख सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असा केला आहे.
करो अथवा मरो सामना खेळणार्या हैदराबाद संघासाठी साहा याने मोलाचे योगदान दिले. त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे डावाच्या सुरुवातीपासूनच हैदराबाद संघाचं पारडं जड होतं.
रवी शास्त्री यांनी केले कौतुक
भारतीय संघांचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साहाचा डाव पाहून त्याचे कौतुक केले आहे. ट्विटरवर या हुशार खेळाडूचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, “जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाने आज उत्तम खेळ केला.”
To the best Glove Man in the world. Outstanding performance tonight – @Wriddhipops #SRHvsDC #IPL2020 pic.twitter.com/BlQvtMR8Cn
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 27, 2020
हैदराबादने दिल्लीसमोर 220 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. यामध्ये वृद्धिमान साहाने 45 चेंडूत 87 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
या सामन्यात कर्णधार डेविड वॉर्नरने त्याला डाव सुरू करण्याची संधी दिली. जलद अर्धशतक करून साहाने संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली.
दिल्लीचा केला पराभव
हैदराबाद संघाने दिल्लीला 88 धावांनी पराभूत केले. हैदराबादने केलेल्या मोठ्या धावसंख्येत साहाने फटकावलेल्या 87 धावांचा समावेश होता. या खेळीत त्याने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार वॉर्नरबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली तर दुसर्या विकेटसाठी त्याने मनीष पांडेबरोबर 63 धावांची भागीदारीही केली. साहाने दोन्ही भागीदारीत अधिक योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे