भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमण आज संपूर्ण क्रिकेट जगतात खूपच चांगलं आहे. पण आता त्या वेगवान गोलंदाजांच्या पर्यायाचा शोध भारतीय निवड समिती घेत आहे. ज्यामुळे याक्षणी निवड समितीची भूमिका खूप महत्वाची ठरते. त्यांना असे आणखी बरेच खेळाडू शोधावे लागतील.
जेव्हा आयपीएल २०२० सुरू होईल तेव्हा प्रत्येकजण काही तरुण भारतीय वेगवान गोलंदाजांवर लक्ष ठेवेल. या खेळाडूंनी शेवटच्या काही सामन्यातील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यानंतर तो भारतीय संघाकडून नियमितपणे खेळण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.
या लेखात त्या ३ वेगवान गोलंदाजांविषयी सांगणार आहोत. ज्यांच्यावर आयपीएल २०२० च्या दरम्यान भारतीय संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष असणार आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचे भविष्य बनण्याची क्षमता आहे.
१. दीपक चहर
स्विंगचा नवा सुलतान म्हणून आपला ठसा उमटविणारा दीपक चहर गेल्या दोन आयपीएल हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्या कामगिरेनीच दीपक चहरने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. पण त्यानंतर तो जखमी झाला आणि संघातून बाहेर पडला.
चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळणारा दीपक चहरवर आता निवड समितीची नजर असेल. तो दुखापतीतून सावरला आहे आणि त्यांना या हंगामात चांगली कामगिरी करू शकला तर भारतीय संघात त्याचे पुनरागमन होऊ शकेल.
दीपक चहर आतापर्यंत आयपीएलमध्ये ३४ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २६.५२ च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा सरासरी २०.८५ आहे. फलंदाजीतूनही तो संघासाठी योगदान देताना दिसू शकतो.
२. खलील अहमद
डावखुरा वेगवान गोलंदाजाच्या शोधत असलेल्या भारतीय संघाला आता खलील अहमदकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यापूर्वीही भारतीय संघाच्या निवड समितीने त्याला संधी दिली होती. पण त्यावेळी कर्णधार आणि निवडकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही.
सनरायझर्स हैदराबादकडून गेल्या मोसमात त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. आता जर त्याना मागील कामगिरीची पुनरावृत्ती केली तर त्याला भारतीय संघातील निवडकर्त्यांकडून आणखी एक संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे या आयपीएलम हंगामात निवडकर्त्यांचे लक्ष त्यांच्यावर असेल.
खलील अहमद आयपीएलमध्ये फक्त १० सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने १७.११ च्या उत्कृष्ट सरासरीने १९ विकेट्स घेतल्या आहेत.
३. कमलेश नागरकोटी
वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू म्हणून कामगिरी करणारा कमलेश नागरकोटी हा वेगवान गोलंदाजीसाठी आणखी एक पर्याय बनताना दिसत आहे. दुखापतीमुळे या तरुण खेळाडूच्या कारकिर्दीच्या सुरुवातील अनेक संकटे आली. आयपीएलच्या शेवटच्या दोन सत्रात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सदस्य असलेला कमलेश आता तंदुरुस्त दिसत आहे. ज्यामुळे तो या लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. गोलंदाजीत त्याच्याकडे चांगला वेग आणि विविधता या दोन्ही गोष्टी आहेत. ज्यामुळे भारतीय संघाचे निवारकर्ते त्याच्यावर देखील लक्ष ठेवून आहेत.
कमलेश नागरकोटी आतापर्यंत ९ अ श्रेणी सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत. त्यात एक अर्धशतक ठोकले आहे. गोलंदाजीत त्याने २५ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…
ट्रेंडिंग लेख –
या ५ महान क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटमध्ये कधीच मिळाला नाही ‘सामनावीर’ पुरस्कार…