---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….

---Advertisement---

१९१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटच्या परिणामामुळे पहिल्या टप्प्यात वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत संथ खेळीची नोंद झाली. वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणार्‍या पहिल्या ५ फलंदाजांचा उल्लेख केला तर रोहित शर्माशिवाय इतर सर्व विक्रम पहिल्या तीन विश्वचषकात नोंदविण्यात आले. मात्र, रोहित शर्मा वगळता सर्व विक्रम ६० षटकांच्या सामन्यात नोंदविण्यात आले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त एका फलंदाजाने एका डावात २०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत आणि ते म्हणजे न्यूझीलंडचे माजी कर्णधार ग्लेन टर्नर यांनी. त्यांनी १९७५ च्या विश्वचषकात पूर्व आफ्रिकेविरूद्ध २००१ बॉलमध्ये १७१ धावांची नाबाद खेळी खेळली होती.

वनडे सामन्यांच्या डावात सर्वाधिक बॉल खेळणार्‍या पहिल्या ५ फलंदाजांवर नजर टाकूया-

१. ग्लेन टर्नर – न्यूझीलंड (२०१ चेंडू वि. पूर्व आफ्रिका आणि १७७ चेंडू वि. भारत १९७५)

१९७५ च्या विश्वचषकात न्यूझीलंडचे कर्णधार ग्लेन टर्नर उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. त्यांनी बर्मिंघममध्ये पूर्व आफ्रिकेविरूद्ध २०१ चेंडूंमध्ये १७१ धावांची नाबाद खेळी केली, त्या त्यामुळे न्यूझीलंडने ६० षटकांत ३०९/५ धावा केल्या आणि प्रतिउत्तरादाखल पूर्व आफ्रिका संघ फक्त १२८/८ धावा करू शकला.

ग्लेन टर्नरने १९७५ च्याच विश्वचषकात मँचेस्टर येथे भारताविरुद्ध आणखी शतक झळकावले आणि १७७ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २३० धावा केल्या होत्या, त्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ५८.५ षटकांत ६ विकेट गमावून विजय मिळविला होता.

अशाप्रकारे, ग्लेन टर्नर वनडे क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या बाबतीत पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर आहेत.

२. मोहसीन खान – पाकिस्तान (१७६ चेंडू वि. वेस्ट इंडीज, १९८३)

पाकिस्तानच्या मोहसीन खान यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध १९८३ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात १७६ चेंडूत ७० धावांची संथ खेळी केली. ओव्हल येथे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ६० षटकांत १८४/८ अशी धावसंख्या उभारली, त्याला उत्तर म्हणून वेस्ट इंडीजने विव्हियन रिचर्ड्सच्या नाबाद ८० धावांच्या मदतीने ४८.४ षटकांत केवळ २ विकेट गमावून विजय मिळविला.

३. सुनील गावस्कर – भारत (१७४ चेंडू वि. इंग्लंड, १९७५)

१९७५ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सुनील गावस्करच्या ह्या अत्यंत संथ इनिंगची आजही चर्चा होते. लॉर्ड्सवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ६० षटकांत डेनिस अमीसच्या (१३७) शतकाच्या मदतीने ३३४/४ अशी मोठी धावसंख्या उभारली, ज्याला उत्तर देताना भारतीय संघ ६० षटकांत फक्त १३२/३ धावाच करू शकला. त्या खेळीत सुनील गावस्कर यांनी १७४ चेंडूंचा सामना केला, त्यात त्यांनी अवघ्या नाबाद ३६ धावा केल्या होत्या.

४. गॉर्डन ग्रीनिज – वेस्ट इंडीज (१७३ चेंडू वि. भारत, १९७९)

१९७९ च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला ९ विकेट्सनी हरवले. बर्मिंघममध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना गुंडप्पा विश्वनाथच्या ७५ धावांच्या मदतीने १९० धावा फटकावल्या होत्या. त्यास उत्तर म्हणून वेस्ट इंडीजने ५१.३ षटकांत केवळ एक गडी गमावून विजय मिळविला. सर गॉर्डन ग्रीनिज यांनी १७३ चेंडूंत १०६ धावांची नाबाद खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिले. या खेळीसाठी त्यांना सामनावीर म्हणून निवडले गेले.

५. रोहित शर्मा – भारत (१७३ चेंडू वि. श्रीलंका, २०१४)

२०१४ मध्ये रोहित शर्मा वनडे सामन्यातील सर्वात मोठी खेळी खेळाला. कोलकातामध्ये श्रीलंकेविरूद्ध रोहितने १७३ चेंडूंत २६४ धावांची शानदार खेळी केली आणि एक अनोखा विश्वविक्रम नोंदविला. रोहितच्या खेळीमुळे भारताने ४०४/५ अशी मोठी धावसंख्या रचली.
या विशाल धावसंख्येचा पाठलाग करण्यास मैदानावर उतरलेला श्रीलंकेचा संघ, रोहितचा वैयक्तिक धावसंख्याही पार करू शकला नाही. केवळ २५१ धावा करून श्रीलंका संघ बाद झाला. ५० षटकांच्या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळलेल्या विक्रमाची नोंद रोहितच्या नावावर आहे.

ट्रेंडिंग लेख –

एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…

अशा ६ घटना जेव्हा नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या क्रिकेटपटूने केले शतक

आयपीएल २०२० दरम्यान या ३ भारतीय वेगवान गोलंदाजांवर असेल निवड समीतीचे लक्ष

महत्त्वाच्या बातम्या – 

रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर

गावसकर, तेंडूलकरांपाठोपाठ वानखेडेच्या एका स्टॅंडला ‘या’ क्रिकेटरचे नाव देण्याची मागणी

‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---