भारतीय फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीत २२ वर्ष ९१ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. तो सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळण्याच्या यादीत अव्वल स्थानी आहे. परंतु सचिनप्रमाणेच अनेक खेळाडू आहे जे सर्वाधिक काळ क्रिकेट खेळले आहे.
सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळणारे खेळाडू:
१. सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून २२ वर्ष ९१ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. या कारकिर्दीत त्याने ४६३ सामने खेळले आहे आहेत. त्याचबरोबर त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. तर नाबाद २०० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो ४१ वेळा नाबाद राहिला आहे.
गोलंदाजी करताना त्याने १५४ बळी घेतले आहे. यात २ वेळा त्याने ५ बळी घेतले आहेत. तर एका डावात ३२ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तसेच तो १८ मार्च २०१२ ला पाकिस्तान विरुद्धच शेवटचा वनडे सामना खेळला होता.
२. सनथ जयसूर्या: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या श्रीलंकेकडून २१ वर्ष १८४ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. त्याने वनडे कारकिर्दीत ४४५ सामने खेळले आहेत. यात त्याने २८ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १३४३० धावा केल्या आहेत. १८९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
त्याचबरोबर ३२३ बळी घेतले आहेत. एका डावात २९ धावांत ६ बळी घेण्याची त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २६ डिसेंबर १९८९ ला वनडे पदार्पण केले होते. तर तो २८ जुन २०११ ला शेवटचा वनडे सामना खेळला आहे.
३. जावेद मियांदाद: पाकिस्तान संघातील एकेकाळचा महान फलंदाज जावेद मियांदाद हा पाकिस्तानकडून २० वर्ष २७२ दिवस वनडे क्रिकेट खेळला. त्याने २३३ वनडे सामने खेळले असून ८ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत. त्याने वनडेत ७३८१ धावा केल्या आहेत. नाबाद ११९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने याबरोबरच ७ बळीही घेतले आहेत.
त्याने विंडीज विरुद्ध ११ जून १९७५ ला वनडे पदार्पण केले होते तर ९ मार्च १९९६ ला भारताविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता.
४. ख्रिस गेल: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने १९ वर्ष आणि ३३७ दिवस वनडे क्रिकेट खेळले आहे. गेलने आपला पहिला वनडे सामना ११ सप्टेंबर १९९९ ला खेळला होता तर अखेरचा सामना १४ ऑगस्ट २०१९ रोजी खेळला आहे.
त्याने कारकिर्दीत एकूण ३०१ वनडे सामने खेळले असून त्यात ३७.८३च्या सरासरीने १०४८० धावा केल्या आहेत. यात त्याच्या २५ शतके व ५४ अर्धशतकांचा समावेश आहे.
५. शोएब मलिक: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने १९ वर्ष व २४५ दिवस वनडे क्रिकेट खेळले आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १४ ऑक्टोबर १९९९ला पदार्पण केले होते तर शेवटचा सामना १६ जून २०१९ रोजी खेळला आहे.
यात त्याने एकूण २८७ वनडे खेळले असून ७५३४ धावा व २१७ विकेट्स घेतल्या आहेत.
६. अरविंदा डी सिल्वा: श्रीलंका संघाचा मनोरंजक पण महान खेळाडूंपैकी एक असणारा अरविंदा डी सिल्वा श्रीलंकेकडून १८ वर्ष ३५२ दिवस वनडे क्रिकेट खेळला. त्याने १९९६ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात शतक केल्याने क्रिकेट इतिहासात त्याचे नाव कोरले गेले. त्याने ३०८ सामने खेळताना ९२८४ धावा केल्या आहेत. यात ११ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची १४५ धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने १०६ बळीही घेतले आहेत.
त्याने न्यूझीलंड विरुद्ध ३१ मार्च १९८४ ला वनडे पदार्पण केले होते. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध १८ मार्च २००३ ला शेवटचा वनडे सामना खेळला होता.
७. जॅक कॅलिस: दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिस १८ वर्ष १८४ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. त्याने ३२८ सामने खेळले आहेत. यात त्याने १७ शतके आणि ८६ अर्धशतकांसह ११५७९ धावा केल्या आहेत. १३९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी करताना ३२८ सामन्यात २७३ बळी घेतले आहेत. यात ३० धावात ५ बळी ही त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध ९ जानेवारी १९९६ ला वनडे पदार्पण केले तसेच १२ जुलै २०१४ ला श्रीलंका विरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला.
ट्रेंडिग घडामोडी-
–१९९८च्या आयसीसी वनडे क्रमवारीतील टॉप १० खेळाडू पाहून व्हाल थक्क
–या १० महान खेळाडूंवर विश्वचषक कायम रुसलाच
–गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान