आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी शानदार फटकेबाजी केलली पाहायला मिळाली आहे. त्यांनी खेळलेले दमदार फटके सर्वांचे लक्ष वेधून घेतात. परंतु असेच काहीसे आता महिला बिग बॅश लीगमध्ये पाहायला मिळाले आहे. ब्रिसबेन हीटची फलंदाज लॉरा किमिन्सने मारलेला अचंबित करणारा चौकार पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतील.
महिला सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळताना ब्रिसबेन हीट संघाला शेवटच्या ६ षटकात ३५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी १५ वे षटक टाकण्यासाठी सिडनी संघाकडून स्टेला कॅम्पबेल आली होती. दरम्यान पहिल्या दोन चेंडूवर लॉराने अनुक्रमे षटकार आणि चौकार ठोकला. त्यानंतर पुढील चेंडूवर २ धाव घेतली. स्टेलाने चौथा चेंडू निर्धाव टाकला. परंतु पाचव्या चेंडूवर तिने नो बॉल टाकला.
याच चेंडूवर लॉराने खाली बसत उलटा शॉट मारला आणि चेंडू चौकाराच्या दिशेने गेला. हा शॉट पाहून समालोचकही हादरले. समालोचकापैकी एकाने म्हटले की, “मी असं कधीच पाहिले नाही.”
यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
No way! How on earth has Laura Kimmince gotten this to the boundary?!
Play of the Day for sure! @CommBank #WBBL06 pic.twitter.com/b8cS0uxKrh
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 17, 2020
🤯🤯
What do you call this shot? Did Laura Kimmince just invent something?#BringTheHeat #WBBL06 pic.twitter.com/fp0VK0pJLS— Brisbane Heat (@HeatBBL) November 17, 2020
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १२२ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान ब्रिसबेन हीट संघाने अवघ्या १७.५ षटकात ७ विकेट्स गमावत १२३ धावा कुटल्या. ब्रिसबेन हीटकडून जेस जोनासन (३४) आणि लॉराने २३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंची अनोखी युक्ती, करतायेत टेनिस बॉलने सराव, पाहा व्हिडिओ
Video: आफ्रिदीची दांडी उडवल्यानंतर गोलंदाजाने जोडले हात; वाचा काय आहे प्रकरण
मिचेल स्टार्कचा राग पाहून कर्णधाराने मागितली माफी; सांगितले डाव घोषित करण्याचे खरे कारण
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…