---Advertisement---

Video: आफ्रिदीची दांडी उडवल्यानंतर गोलंदाजाने जोडले हात; वाचा काय आहे प्रकरण

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 7:39 PM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या गेलेल्या पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलच्या प्ले-ऑफ सामन्यांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. क्वालिफायर १ मधील पराभूत संघ मुलतान सुलतान्स व एलिमिनेटरमधील विजेत्या लाहोर कलंदर्स यांच्यातील क्वालिफायर २ सामना रविवारी (१५ नोव्हेंबर) खेळविण्यात आला. लाहोर कलंदर्सने मुलतान सुलतान्सला २५ धावांनी पराभूत करत, अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली. लाहोरच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ. रऊफने तीन बळी मिळवत, संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याच वेळी त्याने अनुभवी फलंदाज शाहिद आफ्रिदीला बाद केल्यानंतर, केलेले अनोखे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले.

लाहोर कलंदर्सने मिळवली अंतिम फेरीत जागा
शुक्रवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुलतान सुलतान्सचा कराची किंग्जकडून पराभव झाला होता. काल झालेल्या दुसर्‍या एलिमिनेटरमध्ये लाहोर कलंदर्सने मुलतान सुलतान्ससमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, रऊफ आणि डेविड विसेने जबरदस्त गोलंदाजी करत मुलतानचा डाव १५७ धावांवर संपुष्टात आणला. रऊफने लाहोरकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना तीन बळी मिळवले.

रऊफने जोडले आफ्रिदीसमोर हात
रऊफने सलामीवीर झिशान अश्रफ, रायली रूसो आणि शाहिद आफ्रिदी हे तीन बळी आपल्या नावे केले. त्याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीला मुलतानच्या डावाच्या १४ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. रऊफने टाकलेला तो यॉर्कर चेंडू आफ्रिदीला समजला नाही. त्यावेळी आफ्रिदी पहिल्याच चेंडूला सामोरे जात होता. आफ्रिदी बाद होऊन पव्हेलियनकडे परतत असताना, रऊफचे एक वेगळे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. रऊफने आफ्रिदीच्या समोर जाऊन त्याच्याकडे बाद केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. रऊफने आफ्रिदीला आडवे जात हात जोडले. तेव्हा आफ्रिदी हसत हसत मान हलवत पुढे निघून गेला.

https://twitter.com/thePSLt20/status/1328038153790304256

https://twitter.com/IshfaqN29429200/status/1328332876773875713

https://twitter.com/ThoraHannsPagly/status/1328041721490526209

मी ते ठरवून केले
सामन्यानंतर रऊफला या घटनेविषयी विचारले असता तो म्हणाला, “आफ्रिदी खूप अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आहे. मी हे आधीच ठरवून आलो होतो की, मी आफ्रिदीला बाद केले, तर अशाच प्रकारे आनंद साजरा करणार. नशिबाने मला त्याचा बळी देखील मिळाला आणि सेलिब्रेशनदेखील साजरे झाले.”

पीएसएलच्या अंतिम फेरीत उद्या लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्ज आमने-सामने येणार आहेत. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर हा अंतिम सामना पार पडेल.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग बॅश लीग होणार आयपीएलपेक्षा भारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नवी चाल

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---