मुंबई । भारताचा कर्णधार विराट कोहली याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अनेक महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. मात्र आयपीएलमधील आरसीबीच्या संघाचे नेतृत्व करत असताना म्हणावे तसे यश त्याने संघास मिळून दिले नाही. कोहलीने आतापर्यंत 110 सामन्यात आरसीबीच्या संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी 49 विजय तर 55 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे आरसीबीचा संघ अनेकदा गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर राहिला आहे.
विराट कोहलीने पहिल्यांदा 2011 साली आरसीबी संघाचे नेतृत्व सांभाळले. 2017 आणि 2019 साली हा संघ गुणतालिकेत तळाला होता. 2018 साली संघ सहाव्या स्थानावर होता. 2016 साली आरसीबी रनर्स अप राहिला होता. आकाश चोप्राने आयपीएलमध्ये यश का मिळत नाही याचा खुलासा केला आहे.
आकाश चोप्रा म्हणाला, “विराट कोहली योग्य संघाची निवड करत नाही. आरसीबीच्या संघाकडे डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज नाहीत. तसेच तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजीही करू शकतो. या समस्येवर उपाय शोधण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. आरसीबीच्या संघात फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजी दुबळी झाली आहे. आपण योग्य संघ निवडत नसेल तर कर्णधाराकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.”