---Advertisement---

रोहित म्हणतो, धोनी रिटायर झालाय तरीही त्याच्याशी क्रिकेट खेळणं असं सुरूच राहणार

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 10:01 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या निवृत्तीच्या घोषणेनंतर धोनीबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण त्याचबरोबर रोहितने सर्वांना आठवणही करुन दिली की धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळणार आहे.

रोहितने ट्विट केले की ‘भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती. त्याचा क्रिकेटवरील प्रभाव प्रचंड होता. तो एक दृष्टीकोन असलेला तो व्यक्ती आहे आणि संघ कसा तयार करायचा हे माहित असलेला एक मास्टर होता. आम्ही तूला निळ्या जर्सीत(मर्यादीत षटकांमध्ये) नक्कीच मिस करु, पण आपल्याला तो पिवळ्या जर्सीत (चेन्नई सुपर किंग्सची जर्सी पिवळ्या रंगाची आहे) दिसणार आहे. तूझी १९ तारखेला नाणेफेकीवेळी भेट होईलच.’

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असून सध्या चेन्नईमध्ये संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---