मुंबई इंडियन्स आणि दिल्ली केपीटल्स या दोन संघांत गुरुवारी ‘प्ले ऑफ’ चा पहिला सामना म्हणजेच ‘क्वालिफायर 1’ होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा विश्वास आहे की, ते मुंबईविरुद्ध सामना जिंकतील.
आयपीएल मधील शेवटच्या ‘लीग’ सामन्यात दिल्लीने बेंगलोर संघाला पराभूत करून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. कारण या विजयापूर्वी दिल्लीने सलग चार सामने गमावले होते. गुरुवारी मुंबई विरोधात ‘प्ले ऑफ’ चा सामना दिल्ली खेळणार आहे. हा सामना जिंकून थेट अंतिम सामन्यात धडक देण्याचा विचार दिल्लीचा संघ करीत आहे.
सामन्यानंतर श्रेयसचे वक्तव्य
“मुंबई इंडियन्स सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. परंतु मी म्हणेल की आमच्याकडेही निर्भीड आणि दर्जेदार खेळाडूंचा संघ आहे,” असे बेंगलोरविरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला.
पुढे बोलताना अय्यर म्हणाला, “खरं तर त्यादिवशीच्या कामगिरीवर हे अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यात खेळण्याचा खूप अनुभव आहे. परंतु सामन्याच्या दिवसी ज्या संघाचा दृष्टिकोन चांगला असतो आणि जो संघ चांगली कामगिरी करतो, तोच संघ पुढे यशस्वी होईल.”
मुंबईविरुद्ध दुबईतील सामन्यात सहजपणे दबावाचा सामना करणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे अय्यरने म्हटले. तो म्हणाला, “आम्हाला दबावाच्या परिस्थितीत गोष्टी सहतेने हाताळाव्या लागतील. आम्ही ज्या प्रकारे पुढे जात होतो, त्यात आम्हाला चांगला विजय मिळाला. यामुळे आमचे मनोबलही वाढेल. सलग चार पराभवांनंतर हा विजय आमच्यासाठी आवश्यक होता. मी आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने खुश आहे.”
रोहित संघात परतल्याने मुंबईचे बळ वाढले
रोहित शर्मा दुखापती मुळे बाहेर असल्याने कायरन पोलार्ड त्याच्या जागी संघाची धुरा सांभाळत होता. अशाही परिस्थितीत संघाने आपली यशस्वी घोडदौड पुढे सुरू ठेवली होती. सलामीला देखील इशन किशनने डी कॉकसोबत उत्तम खेळ करून दाखवला. मात्र कर्णधार रोहित शर्मा संघात परतल्याने संघाचे बळ आणखीन वाढले असून दिल्लीसाठी खरंतर हा सामना जड जाऊ शकतो, असे काही जाणकार सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
-मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
-बिगुल वाजलं! प्ले ऑफमध्ये चार संघांचे स्थान निश्चित; ‘असे’ असतील क्वालिफायर आणि एलिमिनेटरमधील सामने
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का