---Advertisement---

आयपीएल २०२१ लिलावात एक कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागलेल्या खेळाडूंची संपुर्ण यादी

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 4:55 PM
IPL-Trophy-Ganguly-Rohit
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव चेन्नई येथे सुरू झाला आहे. जगभरातील तब्बल २९२ खेळाडू या लिलावात नशीब आजमावत आहेत. यातील आत्तापर्यंत ख्रिस मॉरिसला १६ कोटी २५ लाख तर ग्लेन मॅक्सवेलला १४ कोटी २५ लाख रुपयांची बोली लागली आहे. ख्रिस मॉरिस तर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ख्रिस मॉरिसपुर्वी हा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याला २०१५मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने १६ कोटींना संघात घेतले होते.

लिलावात आतापर्यंत करुण नायर, केदार जाधवसारखे खेळाडू हे अनसोल्ड राहिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला परदेशी खेळाडूंना मात्र चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

आयपीएल २०२१ लिलावात विकले गेलेले खेळाडू
ख्रिस मॉरिस- १६ कोटी २५ लाख, राजस्थान
ग्लेन मॅक्सवेल- १४ कोटी २५ लाख, बेंगलोर
झाय रिचर्डसन- १४ कोटी, पंजाब
मोईन अली- ७ कोटी, चेन्नई
नॅथन कुल्टर नाईल- ५ कोटी, मुंबई
शिवम दुबे- ४ कोटी ४० लाख, राजस्थान
ऍडम मिल्ने- ३ कोटी २० लाख, मुंबई
शाकिब अल हसन- ३ कोटी २० लाख, कोलकाता
पियुष चावला- २ कोटी ४० लाख, मुंबई
स्टिवन स्मिथ- २ कोटी २० लाख, दिल्ली
दाविद मालान- १ कोटी ५० लाख, पंजाब
मिश्तफिझूर रहेमान- १ कोटी, राजस्थान
उमेश यादव- १ कोटी- दिल्ली

महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस माॅरिस ठरला आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू, या संघाने लावली १६.२५ कोटींची बोली
मार्केटमध्ये मॅक्स भाऊचा दरारा कायम.! मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची विक्रमी बोली, या संघाने घेतले ताफ्यात
आयपीएल लिलाव : मुंबईकर शिवम दुबेवर या संघाने लावली ४ कोटी ४० लाखांची बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---