---Advertisement---

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर पाहून व्हाल चकीत! भारतच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही स्थान नाही

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 2:26 PM
rohit-virat-odi
---Advertisement---

सालाबादप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी (२० जानेवारी) वर्षातील सर्वोत्तम वनडे संघाची घोषणा केली आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयसीसीच्या २०२१ वर्षातील सर्वोत्तम वनडे पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळालेले नाही. या संघाचे कर्णधारपद पाकिस्तानच्या बाबर आझमला देण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे बाबर आझम याला यंदा आयसीसीच्या २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी२० पुरुष संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. तसेच या संघातही एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच केवळ भारतच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील खेळाडूंनाही या संघात स्थान मिळालेले नाही.

आयसीसीच्या २०२१ वर्षातील सर्वोत्तम वनडे पुरुष संघात बाबर आझम व्यतिरिक्त पाकिस्तानच्या फखर जमानला देखील स्थान मिळाले आहे. तसेच या संघात श्रीलंका, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या प्रत्येकी २ खेळाडूंना आणि बांगलादेशच्या ३ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

दरम्यान, २००४ पासून सुरू झालेल्या आयसीसी पुरस्कारांमध्ये दरवर्षी सर्वोत्तम संघ घोषित केला जातो. पण यंदा पहिल्यांदाच असे झाले आहे की, आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम पुरुष वनडे संघामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. यापूर्वी आयसीसीच्या प्रत्येक सर्वोत्तम वनडे संघात किमान एकातरी भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळाले होते. 

यामागे २०२१ वर्षात भारतीय संघाने मोजकेच वनडे सामने खेळल्याचे एक कारण असू शकते. भारताने २०२१ वर्षात केवळ ६ सामने खेळले होते. या वर्षात सर्वाधिक वनडे सामने श्रीलंकेने खेळले होते. त्यांनी १५ सामने खेळले होते.

आयसीसी २०२१ चा सर्वोत्तम वनडे संघ
आयसीसीने निवडलेल्या २०२१ सर्वोत्तम वनडे संघाचे कर्णधारपद मिळालेल्या बाबर आझमने २०२१ वर्षात ६ वनडे सामने खेळताना ६७.५० च्या सरासरीने २ शतकांसह ४०५ धावा केल्या होत्या. तसेच त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. त्याशिवाय फखर जमानने देखील उत्तम कामगिरी करताना ६ सामन्यात ३६५ धावा केल्या होत्या.

आयसीसीच्या या संघात श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा आणि दुशंता चमिराला संधी मिळाली आहे. हसरंगाने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने २०२१ वर्षात १४ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ३५६ धावा केल्या, तसेच १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर चमिरानेही या वर्षात वनडेत सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या.

अधिक वाचा – स्मृती मंधाना | एकट्या पोरीने राखली १४० कोटी भारतीयांची लाज; विराट, रोहित सगळेच झिरो

त्याचबरोबर २०२१ वर्षाच्या सर्वोत्तम वनडे संघात दक्षिण आफ्रिकेच्या जानेमन मलान (५०९ धावा) आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन (३४२ धावा) यांना स्थान मिळाले आहे, तर आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग (७०५ धावा) आणि सिमी सिंगला (१९ विकेट्स) स्थान मिळाले आहे. तसेच बांगलादेशच्या शाकिब अल हसन (१७ विकेट्स आणि २७७ धावा), मुस्तफिजूर रेहमान (१८ विकेट्स) आणि मुशफिकुर रहिम (४०७ धावा) यांना या संघात निवडण्यात आले आहे.

व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?

असा आहे आयसीसीचा २०२१ सर्वोत्तम वनडे संघ – पॉल स्टर्लिंग (आयर्लंड), जानेमन मालन (दक्षिण आफ्रिका), बाबर आझम (पाकिस्तान) (कर्णधार), फखर जमान (पाकिस्तान), रस्सी वॅन डर ड्यूसेन (दक्षिण आफ्रिका), शाकिब अल हसन (बांगलादेश), मुशफिकुर रहीम (बांगलादेश), वनिंदू हसरंगा (श्रीलंका). श्रीलंका), मुस्तझिफुर रहमान (बांगलादेश), सिमी सिंग (आयर्लंड) आणि दुष्मंथा चमीरा (श्रीलंका).

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: ‘तुला गर्लफ्रेंड आहे का?’, कपिल शर्माच्या प्रश्नावर पृथ्वी शॉने दिले ‘हे’ उत्तर

धोनीच्या शिष्याला क्विंटन डी कॉकने ‘धोनी स्टाईल’मध्ये धाडले माघारी, पाहा व्हिडिओ

फलंदाजांनी ठोकले अन् गोलंदाजांनी रोखले! १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचा आर्यलंडवर दणदणीत विजय

https://www.youtube.com/watch?v=lXFjT0qS4Yw

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---