---Advertisement---

भयंकर! रोहितच्या मुंबई इंडियन्स संघात कोरोनाने केला प्रवेश, ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीला झाली कोरोनाची बाधा

On: मंगळवार, एप्रिल 6, 2021 3:55 PM
---Advertisement---

भारतात गेल्या दिडवर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या विळख्यात आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूदेखील अडकले आहेत. त्यातच येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होत आहे. मात्र, या हंगामापूर्वी काही संघांच्या सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आता मुंबई इंडियन्सच्या एका सदस्याचाही समावेश झाला आहे.

मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षण मार्गदर्शक किरण मोरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबद्दल मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने असेही सांगितले आहे की किरण मोरे यांनी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच त्यांना कोणतही लक्षणे नव्हती.

https://twitter.com/mipaltan/status/1379364729169215490

डॉक्टरांच्या निगराणीत आहेत किरण मोरे
मुंबई इंडियन्सने ट्विट करत सांगितले आहे की, ‘किरण मोरे हे बीसीसीआयने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहेत. तसेच ते सर्व खबरदारी घेत आहेत. मुंबई इंडियन्सची मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1379364851089203207

मुंबई इंडियन्सने चाहत्यांना केली खास अपिल
आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. या संघाचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच मुंबई इंडियन्सने संघांच्या चाहत्यांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. तसेच कोरोनापासून स्वत:चा बचाव देखील करायला सांगितला आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1379364990927302660

आयपीएलचा उद्धाटनाचा सामना खेळणार मुंबई
आयपीएल २०२१चा उद्धाटनाचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे होणार आहे. परंतू सामन्याला ३ दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कोरोनामुळे गोंधळ उडाला आहे.

किरण मोरे यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
माजी यष्टीरक्षक किरण मोरे भारताकडून ४९ कसोटी व ९४ वनडे सामने खेळले असून त्यात त्यांनी कसोटीत १२८५ धावा व वनडेत ५६३ धावा केल्या होत्या. ७३ या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोत्तम धावा होत्या. बदोडा येथे जन्मलेल्या मोरे यांच्या बडोदा येथे क्रिकेट अकादमी आहे. किरण मोरे हे एक क्रिकेटपटूंपेक्षाही एक खेळाडू घडविणारे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात. त्यांनीच हार्दिक व कृणाल या पंड्या भावांना पहिल्यांदा मार्गदर्शन केले होते. तसेच एमएस धोनी चित्रपटापुर्वी त्यांनीच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या शिकवणी घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ खेळाडूने कधीकाळी पैशामुळे सोडली होती क्रिकेट, आज आयपीएलमुळे झालाय कोट्याधीश

अजिंक्य रहाणेच्या आजीचे निधन; ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण

मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी मंत्र वाचणाऱ्या आजी ते विरुष्काचा इशाऱ्यातील प्रेमळ संवाद; वाचा आयपीएलचे ‘बेस्ट मुमेंट्स’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---