भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली रविवारी (5 नोव्हेंबर) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट क्रिकेटच्या मैदानात रोज नवनवीन विक्रम करतोय. परंतु हा नवा विक्रम ऐकून आपण अवाक व्हाल. भारताच्या या कर्णधाराचा महिन्याचा पिण्याचा पाण्याचा (Drinking Water) खर्च अंदाजे 36000 रुपये एवढा आहे.
विराट कोहली (Virat Kohli) जे पाणी रोज पितो ते फ्रान्सवरून (France) येते. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे किंमत आहे 600 रुपये. एव्हियन (Evian) नावाचे मिनरल वाॅटर (बंद बाटलीतील पाणी) विराट रोज पितो. फ्रान्समधील ग्रामीण भागात जे नैसर्गिक झरे आहेत तिथेच हे पाणी मिळते. ह्या पाण्याच्या बाटल्या भारतात मोठ्या आणि छोट्या प्रकारात मिळतात. छोटी बाटली अंदाजे 240 रुपयांना मिळते. भारतीय संघाचा हा माजी दिग्गज कर्णधार आपल्या आहाराबद्दल अतिशय काळजी करणारा आहे. जेव्हा तो कुठेही बाहेर जातो तेव्हा ह्याच ब्रँडच पाणी पिण्यासाठी मागतो. बऱ्याच वेळा तो स्वतःच पिण्याचं पाणी बरोबर बाळगतो.
जपानमधील कोना निगारी मिनरल वॉटरची किंमत 26 हजार रुपये प्रति लीटर आहे. हे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी पितात. तर अजून एक जपानी ब्रॅंड फिलिक्कोची पाण्याची 750 मिलीलिटरची बाटली 14 हजार रुपयांना मिळते. हे महागडे मिनरल वॉटर जास्त करून खेळाडू आणि सेलिब्रिटी पितात. आजकाल भारत आणि जगात खेळाडू आणि सेलेब्रिटी हे आपल्या शरीर आणि आहाराबद्दल काहीसे अधिकच जागरूक झालेले दिसतात. यात विराट कोहली हे नाव सर्वात वरच्या स्थानी येते. विराटमुळेच अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या आहार तसेच दैनंदिन जीवनात बदल केले आहेत.
Evian water bottles are available in different sizes at different prices. Small sized bottle of Evian band bottle costs around ₹240 in India
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) April 22, 2017
विराटचा आज 33 वा वाढदिवस असून त्याने भारताकडून एकूण 514 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून एकूण 26209 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. यात त्याने 78 शतकं आणि 136 अर्धशतकं केली आहेत.
हेही वाचा-
अशी 2 कारणे, ज्यामुळे रोहित अन् विराटची तुलना तर होणारंच, एक नजर टाकाच
Birthday: 35व्या वयात पदार्पण करणाऱ्या विराटने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!
विराट कोहलीने जेव्हा गोलंदाजांची केली होती पळता भुई थोडी, वाचा त्याच्या 5 सर्वोत्तम खेळींबद्दल