2022 वर्षाच्या शेवटी क्रिडा विश्वात दोन मोठे विश्वचषक खेळले गेले. यामधील एक पुरुष क्रिकेट संघांचा टी20 विश्वचषक आणि दुसरा पुरूष फुटबॉल संघाचा विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांनी क्रिडाविश्व चांगलेच ढवळून निघाले. सर्वात शेवटी फुटबॉलचा विश्वचषक खेळला गेला. जो सर्वाधिक लोकप्रिय ठरला, कारण फुटबॉलचे चाहते जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच यावर्षी तब्बल 5 वेगवेगळे विश्वचषक खेळले गेले. त्याची माहिती आपण पाहुया.
1. फिफा विश्वचषक- पुरूष फुटबॉल संघाचा हा 22वा विश्वचषक पहिल्यांदाच अरबी देशामध्ये खेळला गेला. कतारमध्ये पार पडलेली ही स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर, 2022 दरम्यान खेळली गेली. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेत ब्राझील, जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, पोर्तुगल या मोठ्या संघाचा एकदा तरी पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, कॅमरून, कॅनडा, कोस्टा रिका, क्रोएशिया, डेन्मार्क, इक्वाडोर, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, घाना, इराण, जपान, कोरिया रिपब्लिक, मेक्सिको, मोरोक्को, नेदरलॅंड्स, पोलंड, पोर्तुगल, कतार, सोदी अरेबिया, सेनेगल, सर्बिया, स्पेन, स्वित्झर्लंड, ट्युनिशिया, अमेरिका, उरुग्वे, वेल्स हे ते संघ होते.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्स आणि अर्जेंटिना समोरा-समोर आले. ज्यामध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली आणि विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. हा सामना पूर्णवेळ 3-3 असा बरोबरीत राहिला आणि अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला 4-2 असे पराभूत केले.
2. पुरूष ब्लाइंड टी20 विश्वचषक– हा विश्वचषक भारतात 5 ते 17 डिसेंबरमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताबरोबर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या 34 खेळाडूंना भारताच्या मंत्रालयाने व्हिसा मान्य केला. या स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर खेळला गेला. त्यामध्ये भारत आणि बांगलादेश समोरा-समोर आले. हा सामना भारताने 120 धावांनी जिंकला. या सामन्यात सुनिल रमेश सामनावीर ठरला. भारत या स्पर्धेत अपराजित राहिला. त्यांनी तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिकंला असून या स्पर्धेची बक्षिस रक्कम 3 लाख रुपये होती.
3. आयसीसी पुरूष टी20 विश्वचषक- पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. जो खेळाडूंच्या दुखापतींमुळे गाजला. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच अनेक संघाचे महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. ज्यामध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचादेखील समावेश होता. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा 13 नोव्हेबंरपर्यंत रंगली. यामध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तान-इंग्लंड समोरा-समोर आले. ज्यामध्ये इंग्लंडने 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. इंग्लंड दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचा मानकरी ठरला. यामुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघ सर्वाधिक वेळा टी20 विश्वचषक जिंकणारे पुरुष संघ ठरले.
4. आयसीसी महिला वनडे विश्वचषक- महिला क्रिकेट संघांचा हा 12 वा वनडे विश्वचषक होता. जो न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान खेळला गेला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या 8 संघांनी सहभाग नोंदवला. याचा अंतिम सामना ख्रिस्टचर्चमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करत सातव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला.
5. आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक – वनडे प्रकारातील ही स्पर्धा 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये खेळली गेली. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये यजमानांबरोबर, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, पपुआ न्यू ग्युआना, आयर्लंड, युगांडा, भारत, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, युनायटेड अरब अमिराती, बांगलादेश, इंग्लंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा समावेश होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि भारत भिडले. ज्यामध्ये भारताने 4 विकेट्सने सामना जिंकत पाचव्यांदा 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
2022मध्ये 200 शतके! क्रिकेटच्या इतिहासात यावर्षी रचला गेला बलाढ्य विक्रम, तुटले सर्व रेकॉर्ड्स
Bye Bye 2022 : भारताबाहेर वनडेत ‘या’ 5 भारतीयांची तळपलीय बॅट, एकाची सरासरी 90पेक्षाही जास्त