---Advertisement---

CWC 2023: बांगलादेश की अफगाणिस्तान? कोण करणार विजयी प्रारंभ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 10:54 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना आशियाई क्रिकेटमधील दोन महत्त्वाचे संघ असलेल्या बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जाईल. विश्वचषकातील हा तिसरा सामना असेल. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल.

बांगलादेश क्रिकेट संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येतोय. त्यांनी आशिया चषकात भारतीय संघाला पराभूत करण्यात यश मिळवलेले. त्यानंतर सराव सामन्यात देखील त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली. या पहिल्या सामन्यात संघाची मदार कर्णधार शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन व महमदुल्लाह यांच्यावर असेल. तसेच गोलंदाजीची मदार तस्किन अहमद व मुस्तफिझूर रहमान यांच्यावर असेल.

दुसरीकडे अफगाणिस्तान संघ या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. अफगाणिस्तानच्या सर्व प्रमुख खेळाडूंना भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. सराव सामन्यात देखील त्यांनी श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. अफगाणिस्तान संघाची मुख्य ताकद त्यांचे अनुभवी फिरकीपटू आहेत. राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब ही तिकडी विरोधी फलंदाजांना अडचणीत टाकू शकते. धरमशाला येथील वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर नवीन उल हक व फझलहक कमाल करू शकतात. तर, फलंदाजीत कर्णधार शाहिदी, रहमत शहा व रहमानुल्लाह गुरबाज हे संघासाठी मुख्य भूमिका बजावतील.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर केले जाईल. तर, लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर होईल.

अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, नवीन-उल-हक.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब.

(2023 ODI World Cup 2023 Afganistan V Bangladesh Match Preview)

महत्वाच्या बातम्या – 
20 वर्षांपूर्वी बापाने केलेली कामगिरी बास डी लीडेने पुन्हा प्रत्यक्षात उतरवली, मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान
शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही? प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वतः दिली माहिती 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---