वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत 34 वा सामना अफगाणिस्तान व नेदरलँड्स यांच्या दरम्यान होणार आहे. लखनऊ येथील ईकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. स्पर्धेच्या सुरुवातीला दुबळे म्हणून समजल्या गेलेल्या या संघाने प्रत्येकी दोन विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपले दावेदारी ठोकली आहे. या सामन्यात दोन गुण घेत ही दावेदारी आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंड, पाकिस्तान व श्रीलंका या मोठ्या संघांना हरवत खळबळ उडवून दिली आहे. नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून ते थेट पहिल्या पाचमध्ये दाखल होतील. तर त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये एक विजय मिळवला तरी ते उपांत्य फेरीसाठी मजबुतीने उभे राहू शकतात.
दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सने सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला हरवून सनसनाटी निर्माण केली होती. तसेच मागील सामन्यातही त्यांनी बांगलादेशला पराभूत केले आहे. त्यांचे अद्याप तीन सामने शिल्लक असले तरी ते, आणखी एखादा अपसेट करत दुसऱ्या संघासाठी धोका निर्माण करू शकतात.
लखनऊ येथे होणाऱ्या या सामन्यात फिरकीला मदत करणारी खेळपट्टी पाहता येऊ शकते. असे झाल्यास अफगाणिस्तान संघाचे पारडे जड असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
अफगाणिस्तान: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इक्रम अली खिल, अझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारूखी, नूर अहमद.
नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाऊड, वेस्ली बारेसी, कॉलिन एकरमन, वॅन डर मर्व, बास डी लिडे, तेजा, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), लोगन वॅन बिक, पॉल मिकरेन, आर्यन दत्त.
(2023 ODI World Cup 2023 Afghanistan V Netherlands Preview)
महत्वाच्या बातम्या –
विजयाच्या सप्तपदीनंतर रोहितचे मोठे विधान, म्हणाला, “चेन्नईतून सुरुवात केली आणि आता…”
वर्ल्डकपमध्ये शमीपेक्षा भारी कोणीच नाही! विकेट्सचं पंचक घेत बनला भारताचा बेस्ट बॉलर