---Advertisement---

वर्ल्डकपमध्ये शमीपेक्षा भारी कोणीच नाही! विकेट्सचं पंचक घेत बनला भारताचा बेस्ट बॉलर

Mohammed Shami
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुरुवारी (2 नोव्हेंबर) खेळला गेलेला सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनी देखील मैदानात कहर प्रदर्शन केले आणि सामना नावावर केला. मोहम्मद शमी पुन्हा एकदा संघासाठी मॅच विनर ठरला. सामन्यात घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर शमीने संघाला विजय मिळवून दिलाच, पण वनडे विश्वचषकात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज देखील ठरला. भारताने या सामन्यात 302 धावांचा विशाल विजय मिळवला. 

मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने भारतासाठी वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम गुरुवारी नावावर केला. शमीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्याताली पहिल्या पाच षटकांमध्ये 18 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. सोबतच विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक 45 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. भारताचा माजी दिग्गज झहीर खान आणि जवागल श्रीनात यांना त्याने पझाडले.

याआधी भारतासाठी विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज होता झहीर खान. झहीरने वनडे विश्वचषकाच्या इतिहासात 23 सामने खेळले असून यात 44 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 20.22 राहिली, तर इकॉनॉमी रेट 4.47 एवढा होता. जवागल श्रीनाथ आणि झहीर यांनी प्रत्येकी 44-44 विश्वचषक विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, श्रीनाथ यांना ही कामगिरी करण्यासाठी 34 इनिंग खेलाव्या लागल्या. यादरम्यान त्यांची सरासरी 27.81 राहिली असून इकॉनॉमी रेट 4.32 एवढा होता. गुरुवारी मोहम्मद शमीने मात्र, या दोन्ही दिग्गजांना मागे टाकले. (Mohammad Shami became India’s highest wicket-taker in the World Cup)

वनडे विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज
मोहम्मद शमी- 45* (14 डाव)
झहीर खान – 44 (23 डाव)
जवागल श्रीनाथ – 44 (33 डाव)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्‍मद सिराज, मोहम्मद शमी.

श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका.

महत्वाच्या बातम्या – 
सिराजच्या चेंडूने श्रीलंकेची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त, सात चेंडूत घेतल्या तीन महत्वाच्या विकेट्स
शतक हुकलं पण विराटने लावली विक्रमांची रांग! वानखेडेवर ठरला ‘रेकॉर्डब्रेकर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---