भारतीय गोलंदाजी आक्रमन मायदेशात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भेदक गोलंदाजी करत आहे. गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने अशाच पद्धतीने विरोधी संघाच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. मोहम्मद सिराज याचे कौतुक करावे तितके कमीच.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या सामन्यात भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 357 धावांपर्यंत मजल मारली. तसेच प्रत्युत्तरात गोलंदाजांनी संघाला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह याने पथूम निसांका याचा पायचीत पकडले. त्यानंतर पुढच्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. सिराजने या षटकातील पहिल्या चेंडूवर दिमूथ करुनारत्ने याला पायचीत पकडले. तसेच षटकातील पाचव्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा याला श्रेयस अय्यर याच्या हातात झेलबाद केले.
सिराज सामन्यातील चौथ्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आळा. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याचा त्रिफळा उडवला. यातील कुसल मेंडिस याने एक धाव करून विकेट गमावली, पण सदिरा समरविक्रमा आणि दिमूथ करुनारत्ने यांना एकही धाव करता आली नाही. संघाची धावसंख्या तीन असताना श्रीलंकेने पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. (In the match against Sri Lanka, Mohammad Siraj took three wickets off seven balls)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका.
महत्वाच्या बातम्या –
जस्सी जैसा कोई नही! पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला दिला दणका
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने आणली धावांची त्सुनामी! विराट-गिलनंतर श्रेयस-जड्डूचा धमाका