प्रत्येक क्रिकेट चाहत्याला भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा लागली आहे. अशात या वनडे विश्वचषकाच्या तारखांबाबत मोठा खुलासा झाला आहे. एवढेच नाही, तर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि कधी होणार याबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त या विश्वचषकाचे सामने कोणकोणत्या शहरांमध्ये खेळले जाणार आहेत, यावरूनही पडदा उठला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊयात…
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या तारखांची घोषणा
आघाडीच्या क्रीडा वेबसाईटच्या माहितीनुसार, भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होऊ शकते. रिपोर्ट्समध्ये खुलासा झाला आहे की, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल. यामध्ये असेही सांगण्यात आले की, स्पर्धेत प्ले-ऑफ सामन्यांसह एकूण 48 सामने खेळले जातील. भारताच्या 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळले जातील. त्यात हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदोर, दिल्ली, लखनऊ, बंगळुरू, धरमशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.
ICC World Cup 2023 (Source – Espn Cricinfo):
Date – Oct 5 to Nov 19
Days – 46
Group games – 45
Knock outs – 3
Teams – 10
Venues – 11 (Ahmedabad Bengaluru, Chennai, Delhi, Dharamsala, Guwahati, Hyderabad, Kolkata, Lucknow, Indore, Rajkot, Mumbai)
— Johns. (@CricCrazyJohns) March 22, 2023
या दिवशी होणार अंतिम सामना?
खरं तर, भारत 10 वर्षांपासून आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. अशात भारताचे लक्ष्य वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा जिंकण्यावर असणार आहे. भारताने 12 वर्षांपूर्वी मायदेशात खेळल्या गेलेल्या 2011 सालचा वनडे विश्वचषक जिंकला होता. अशात यावेळी भारत 2023 वनडे विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी चांगली झुंज देईल. भारतात होणाऱ्या या वनडे विश्वचषकाला अजून 7 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
त्यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून ते 11 जूनदरम्यान लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. (2023 ODI world cup likely to start on 5th october world cup dates final on 19th november)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत अपयशी ठरत असलेल्या सूर्याच्या खांद्यावर ठेवला कोच द्रविडने हात! म्हणाला, “त्याच्यात गुणवत्ता असून…”
कांगारू रोखणार टीम इंडियाचा विजयरथ? चेन्नईत रंगणार निर्णायक सामना, अशी असू शकते प्लेईंग 11