वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (7 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळले जातील. दिवसातील दुसरा सामना आशिया चषकाचे उपविजेते श्रीलंका व यावेळी विजेतेपदाचे दावेदार मानले जात असलेल्या दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळला जाईल. विश्वचषकातील हा चौथा सामना असेल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.
काही दिवसांपूर्वीच श्रीलंका संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, त्यांना भारतीय संघाकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी श्रीलंका संघ मजबूत दिसून येतो. कुसल मेंडीस व सदिरा समरविक्रमा हे शानदार फॉर्ममध्ये असून सातत्याने धावा करत आहेत. यासह धनंजय डी सिल्वा व कर्णधार दसून शनाका हे संघासाठी अष्टपैलू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील. गोलंदाजीत अनुभवी महिश थिक्षणा व मथिशा पथिराना यांच्यावर श्रीलंकेची मदार राहणार आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ यावेळी चांगलाच मजबूत दिसून येतोय. कर्णधार टेंबा बवुमा, डेव्हिड मिलर, ऐडन मार्करम, रासी वॅन डर डसेन व हेन्रिक क्लासेन हे सर्व फलंदाज भारतात अनेक वर्ष खेळत आहेत. अष्टपैलू केशव महाराज व मार्को जेन्सन संघाला मजबुती देतील. तर गोलंदाजीत संघाची मुख्य मदार कगिसा रबाडा याच्यावर असेल.
दिल्ली येथील या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना काहीशी मदत मिळेल. मात्र, फलंदाजांकडे मोठी धावसंख्या रचण्याची संधी असणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर, डिज्नी प्लस हॉटस्टारवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्को जेन्सन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर डसेन.
श्रीलंका संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुनिथ वेललागे, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा.
(2023 ODI World Cup Srilanka v South Africa Match Preview)
महत्वाच्या बातम्या –
20 वर्षांपूर्वी बापाने केलेली कामगिरी बास डी लीडेने पुन्हा प्रत्यक्षात उतरवली, मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान
शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही? प्रशिक्षक राहुल द्रविडने स्वतः दिली माहिती