नुकतीच ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाची धामधुम संपली. इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर आता 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेची तयारी देखील सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या पुढील विश्वचषकाचे प्रारूप कसे असेल याबाबत नुकतीच माहिती दिली. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून टी20 विश्वचषकात संघ वाढवण्याबाबत जी मागणी होत होती, ती मागणी यावेळी पूर्ण झालेली दिसत आहे.
आयसीसीने नुकतेच 2024 टी20 विश्वचषकाचे प्रारूप जाहीर केले. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होतील. पात्रता फेरीत प्रत्येकी पाच संघांचे चार गट या विश्वचषकात आपल्याला दिसतील. यानंतर प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर 8 फेरी खेळतील. त्या आठ संघाचे दोन गटांमध्ये विभाजन होईल. त्यानंतर या दोन गटातील पहिल्या व दुसऱ्या स्थानी राहणारे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 2024 टी20 विश्वचषकाचे यजमानपद वेस्टइंडीज व अमेरिका भूषवतील.
आतापर्यंत टी20 विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आले आहेत. त्यातील 8 संघांना थेट मुख्य फेरीत जागा मिळत होती. तर, उर्वरित आठ संघ पात्रता फेरी खेळत. पात्रता फेरीतून चार संघांना मुख्य फेरीत जाण्याची संधी मिळते. त्यानंतर प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये सुपर 12 फेरी खेळवली जाते.
टी20 विश्वचषक 2024 साठी सध्या 12 संघ पात्र ठरले आहेत. यजमान असल्याने वेस्ट इंडिज व अमेरिका यांना थेट संधी मिळेल. 2022 टी20 विश्वचषकात अव्वल 8 संघात राहिलेल्या इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व नेदरलँड्स यांना पुढील विश्वचषकात जागा मिळाली आहे. तर, नोव्हेंबर 2022 पर्यंत टी20 क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये असलेल्या अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी देखील या विश्वचषकासाठी पात्रता मिळवलीये.
(2024 T20 World Cup Format Changed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच
रोहित शर्माच्या 264 धावांही कमी पडल्या, जेव्हा नारायण जगदीसनने केली ‘एवढ्या’ धावांची विक्रमी खेळी