केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली २८ धावा करून बाद झाला. त्याला व्हर्नोन फिलँडरने बाद केले.
विराटाच्या रूपाने भारताची ४ विकेट गेल्ली असून अजूनही संघासमोरील लक्ष हे १३७ धावांचे आहे. विराट चांगला स्थिरावला असताना बाद झाल्यामुळे संघावरील दबाव वाढला आहे.
विराटने ४० चेंडूंचा सामना करताना २८ धावा केल्या. फिलँडरने जेव्हा विराटला एलबीड्ब्लु बाद केले तेव्हा त्याने डीआरएस घेतला परंतु यातही तो स्पष्टपणे बाद झालेला दिसत होता.
सध्या खेळपट्टीवर वृद्धिमान सहा आणि रोहित शर्मा हे खेळाडू आहेत.