सिडनी येथे रविवारी (२९ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत ३८९ धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. परंतु या आव्हानाचा पाठलाग करताना विराटनेही अफलातून फलंदाजी केली. त्याने ८७ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे.
यासह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २२००० धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४१८ सामने आणि ४६२ डावांमध्ये पूर्ण केली. त्याने ५६.१५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ७० शतके आणि १०५ अर्धशतकेही ठोकली आहेत.
या बाबतीत विराटने सचिनलाही मागे टाकले आहे. सचिनने यापूर्वी ४१८ सामन्यांमध्ये २१००० धावांचा टप्पा पार केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२००० धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रायन लारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा या खेळाडूंचा समावेश आहे.
विराटने १८ ऑगस्ट, २००८ मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
विराटच्या या कामगिरीनंतर अनेक खेळाडूंनी तसेच क्रिकेट बोर्डांनींही ट्वीट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
https://twitter.com/surya_14kumar/status/1332998643201163264
https://twitter.com/BCCI/status/1332994918428536833
https://twitter.com/ICC/status/1332996007219654657
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये करावे भारतीय संघाचे नेतृत्व”
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज






