पुणे: आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेतआयएफसीआर संलग्न संपुर्ण भारत भरातील रोटरी डिस्ट्रीक्टमधुन 24 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018या कालावधीत पुना क्लब, लिजेंड्स क्रिकेट अकादमी, डेक्कन जिमखाना, ब्रिलीयंट स्पोर्टस अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना, एमसीजीक्रिकेट मैदान, नेहरू स्टेडीयम, व्हिजन क्रिकेट अकादमी येथे होणार आहे.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. 6 गटांमध्ये प्रत्येकी 4 संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघ ३ सामनखेळणार असून पहिले 8 संघ प्लॉट अंतिम सामन्यांसाठी पात्र ठरणार आहेत.
स्पर्धेत हरियाणा आरआयडी 3080, ठाणे थंडर्स, पिंपरी पँथर्स, कोवई रॉकर्स, राजगड वॉरियर्स, चेन्नई थलायवाज्, 3के तमील थलायवर्स,जेंटलमेन इलेवन, पुणे विनर्स, बेंगलुरू रॉयल्स, इस्टर्न नाईट्स, कुंभकोनम, चेन्नई मचन्स, बेंगलुरू बुल्स, कोची टस्कर्स, हैद्राबाद हुरिकेन्स,चेन्नई गुरूज्, नाशिक एव्हरशाईन, मुंबई इलाईट वॉरियर्स, रायझींग स्टार्स कोल्हापुर, चेन्नई सिंघम्स, हसन, रोटरी फायरबॉल नागपुर,मिड-टाऊन वॉरियर्स सांगली हे 24 संघ झुंजणार आहेत.
सर्व सामने पांढ-या लेदर बॉलने व रंगीत कपड्यांमध्ये खेळले जाणार आहेत. स्पर्धेचे सामने हे 15षटकांचे असणार असून प्रत्येक सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 चे चेअरमन मंगेश हंडे यांनी दिली.
तसेच, साखळी फेरीत प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाजतसेच मालिकावीर यांना करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार आहे.