fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत २५ हजार चेंडू टाकणारे गोलंदाज

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

याच सामन्यात गोलंदाजीतही एक खास विक्रम झाला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडने कसोटी कारकिर्दीत २५ हजार चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. त्याने काल जेव्हा चेतेश्वर पुजारा ८३व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला तो त्याच्या कारकिर्दीतील २५ हजारावा चेंडू होता.

स्टुअर्ट ब्राॅडने कसोटी कारकिर्दीत १२२ कसोटीत २५००५ चेंडू टाकले असुन त्यात १२४०९ धावा देत ४३० विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने १३३ कसोटीत तब्बल ४४०३९ चेंडू टाकले आहेत.

भारतीय गोलंदाजांत केवळ अनिल कुंबळे, कपील देव आणि हरभजन सिंगने २५ हजारपेक्षा जास्त चेंडू टाकले आहेत.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू टाकणारे गोलंदाज-
४४०३९- मुथय्या मुरलीधरन, विकेट्स-८००
४०८५०- अनिल कुंबळे, विकेट्स-६१९
४०७०५- शेन वाॅर्न, विकेट्स-७०८
३११७३- जेम्स अॅंडरसन, विकेट्स-५५७
३००१९- कर्टनी वाॅल्श, विकेट्स-५१९
२९२४८- ग्लेन मॅकॅग्रा, विकेट्स-५६३
२८८१४- डेनीयल विटोरी, विकेट्स-३६२
२८५८०- हरभजन सिंग, विकेट्स-४१७
२७७४०- कपील देव, विकेट्स-४३४
२७११५- लान्स गिब्ज, विकेट्स-३०९
२५७०५- रंगाना हेराथ, विकेट्स-४३०
२५००५- स्टुअर्ट ब्राॅड, विकेट्स-४३०

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 २९ चेंडूत ० धावा…. रिषभ पंतचा अजब कारनामा

 असे झाले कसोटीत ६ हजार धावा करणाऱ्या विराटचे हाॅटेलवर स्वागत

 भारताचा डाव एकहाती सावरणाऱ्या पुजाराचे हे ५ खास पराक्रम पहाच

 चौथी कसोटी: चेतेश्वर पुजाराचे शानदार शतक; टीम इंडियाने…

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?

You might also like