fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचा डाव एकहाती सावरणाऱ्या पुजाराचे हे ५ खास पराक्रम पहाच

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद २७३ धावा केल्या. यातील १३२ धावा एकट्या चेतेश्वर पुजाराने केल्या. तळातील फलंदाजांना हाताशी धरुन पुजाराने जबरदस्त कामगिरी केली.

या खेळीत त्याने काही पराक्रमही केले. ते असे-

-चेतेश्वर पुजाराने केवळ दुसऱ्यांदा आशिया खंडाबाहेर शतकी खेळी केली आहे. यापुर्वी त्याने २०१३मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेविरुद्द कसोटी शतक केले होते.

-चेतेश्वर पुजाराने केवळ तिसऱ्यांदा आशिया खंडाबाहेर २०० पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला. यापुर्वी त्याने २०१३मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेविरुद्द २७०, काल २५७ आणि नाॅटिंगघम कसोटीत २०८ चेंडूंचा सामना केला होता.

-चेतेश्वर पुजाराचे हे कसोटीतील १५वे शतक होते. त्याने इंग्लंडविरुद्ध आता ५ कसोटी शतके केली असुन त्याचे हे पहिलेच इंग्लंडमधील शतक होते.

-१५ कसोटी शतकांतील पुजाराचे हे केवळ ५ वे शतक आहे जे त्याने भारताबाहेर केले आहे.

-पुजाराच्या पदार्पणानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करण्याचा पराक्रम हशिम आमला (१६), केन विलियमसन (१६), कुमार संगकारा (१५) आणि चेतेश्वर पुजारा (१४) यांनी केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?

 

You might also like