fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

असे झाले कसोटीत ६ हजार धावा करणाऱ्या विराटचे हाॅटेलवर स्वागत

साउथॅंप्टन। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती.

विराटचा हा कसोटी कारकिर्दीतील ७०वा सामना आहे. भारताच्या या २९ वर्षीय कर्णधाराने ७० सामन्यातील ११९ डावात ५४.४१च्या सरासरीने ६०४१ धावा केल्या आहेत.

याबरोबर कसोटीत जलद ६ हजार धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट आता दुसऱ्या स्थानी आला. यापुर्वी सुनिल गावसकर यांनी ११७ तर सचिन तेंडूलकरने १२० डावात हा पराक्रम केला होता.

विराटने आता सचिनला मागे टाकले आहे.

काल जेव्हा संघ जेव्हा हाॅटेलवर गेला तेव्हा कारकिर्दीत ६ हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या विराटचे खास स्वागत करण्यात आले. त्यासाठी एक खास केक तयार करण्यात आला होता.

भारतीय संघ सध्या साउथॅंप्टनमधील हार्बर हाॅटेलवर राहण्यासाठी आहे. यात हाॅटेलमध्ये काल हे सेलिब्रेशन झाले.

“तुझ्या ६ हजार धावांसाठी हार्बर हाॅटेल साउथॅंप्टनच्या सर्व टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. ” असा संदेश विराटसाठी बनविण्यात आलेल्या स्पेशल केकवर लिहीण्यात आला होता.

याची माहिती विराटने स्वत: ट्विटरवरुन दिली आहे तसेच हार्बर हाॅटेलच्या ट्विटरवरुनही याला रीट्वीट करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?

You might also like