पुणे, 9 फेब्रुवारी 2024: पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील 26 संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)चे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले की, स्पर्धेत पीवायसी अ, पीवायसी ब, एफसी अ, टेनिसनट्स रॉजर, डेक्कन चार्जर्स, पीसीएलटीए क्ले किंग्ज, एमडब्लूटीए 2, एसेस युनायटेड, पीवायसी ड, टीम चांदणी चौक, टेनिसनट्स राफा, एमडब्लूटीए 3, पीसीएलटीए क्ले हंटर्स, सुपर स्मॅशर्स, महाराष्ट्र मंडळ, कोर्ट मॅजिशियन्स, एफसी ब, टीम योनीराईज, एमडब्लूटीए 1, पीवायसी इ, एफसी क, सोलारिस इगल्स, पीवायसी क, लॉ चार्जर्स, सोलारिस गोगेटर्स, ओडीएमटी नटराजीयन्स हे संघ झुंजणार आहेत.
प्लेट डिव्हिजन गटातील 8 संघ इलाईट डिव्हिजन गटात पात्र ठरणार असून पीवायसी अ, पीवायसी ब, एफसी अ, टेनिसनट्स रॉजर आणि डेक्कन चार्जर्स या संघांना इलाईट इलाईट डिव्हिजन गटात थेट प्रवेश देण्यात आला आहे.इलाईट डिव्हिजन गटात या 12 संघांची 4 गटात विभागणी करण्यात येणार असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील 100व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नरनेची तोडफोट फलंदाजी, टेलर-विराटच्या यादीत मिळवलं स्थान
WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स किती मजबूत? पहा हरमनप्रीतच्या संघाची जमेची बाजू