South Africa T20 League : जगभरातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलपूर्वी सध्या दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल खेळवली जात आहे. या लीगमध्ये 6 संघाचा समावेश आहे. या खेळणाऱ्या 6 संघाना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनी विकत घेतलंय, अशी माहिती समोर आलीये. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये मालकी हक्क मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) अंबानी कुंटुंबीय (Ambani Family), चेन्नईकडून एन.श्रीनिवासन, दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल, सनरायजर्सचे मारन कुटुंबीय, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, राजस्थान रॉयल्सचं मनोज बदाडे या सहा फ्रंचायजींनी संघ विकत घेतले आहे. 10 जानेवारीपासून ही सिरीज सुरू झाली असून 18 जानेवारीपर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले. लीगच्या 12व्या सामन्यात एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स इस्टर्न कॅप यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. शेवटी सनरायझर्सने ईस्टर्न कॅपवर 2 गडी राखून विजय मिळवला.
सनरायझर्सच्या विजयात मार्को जॅनसेनच्या 66 धावांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने अवघ्या 27 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने ही धमाकेदार खेळी खेळली. त्याने सुमारे 244 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. मार्को जॅनसेनने आपल्या डावात अनेक जोरदार फटके मारले. पण त्याच वेळी त्याने मारलेल्या चौकारामूळे क्षेत्ररक्षक व सीमारेषेवर उभी असलेली अँकर याच्यांमध्ये टक्कर झाली. आणि ही अँकर धक्का लागून जोरात खाली पडली. ही अँकर दुसरी तिसरी कोणी नसुन पाकिस्तानची प्रसिद्ध अँकर झैनास अब्बास (Zainab Abbas) होती.
https://www.instagram.com/reel/Cnj2RqXAFIw/?utm_source=ig_web_copy_link
या धडकेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Viral video South Africa T20 League match fielders & anchor zainab abbas collapse on boundary line)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंत फक्त उपस्थित असला तरी…’, दिल्लीच्या प्रशिक्षकांकडून दुखापतग्रस्त यष्टीरक्षकाला मैदानात आमंत्रण
आयपीएल क्रश काव्या मारनची जादू दक्षिण आफ्रिकेतही चालली, लाईव्ह सामन्यात आली लग्नासाठी मागणी