---Advertisement---

क्रिकेटमध्ये असा स्कोरबोर्ड तूम्ही १००% कधी पाहिला नसेल!

---Advertisement---

क्वाॅलालांपूर | आज (३ आॅक्टोबर) चीन विरुद्ध थायलंड या आशिया रिजन क्वाॅलिफायर बी टी२० स्पर्धेतील सामन्यात एक विचित्र धावसंख्या पहायला मिळाला. यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेणारा चीन संघ २० षटकांत चक्क ९ बाद ३५ धावा करु शकला.

या धावांचा पाठलाग करताना थायलंडने केवळ २.४ षटकांत बीनबाद ३६ धावा करत सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना चीनच्या केवळ एका फलंदाजाने ८ धावा, तीन फलंदाजांनी ४ धावा, चार फलंदाजांनी १ धाव, तसेच एकाने ५ तर एका फलंदाजाने २ धावा केल्या. तसेच ४ धावा ह्या अतिरिक्त स्वरुपात मिळाल्या.

३६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या थायलंड संघाने केवळ २.४ षटकांत हे लक्ष पार केले. त्यात त्यांचे सलामीवीर डॅनियल जॅकोब ८ चेंडूत १९ तर मोहम्मद शफिक हक १० चेंडूत १३ धावा काढत नाबाद राहिले. ४ धावा अतिरिक्त स्वरुपात मिळाल्या.

हा सामना थायलंडने १० विकेट आणि चक्क १०४ चेंडू राखुन जिंकला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment