नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(5 मार्च) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसून पहिल्या वनडे सामन्यातील 11 जणांचा संघ कायम ठेवण्यात आला आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाने अंतिम 11 जणांच्या संघात दोन बदल केले आहे. त्यांनी शॉन मार्श आणि नॅथन लिऑनला जेसन बेऱ्हेन्डॉर्फ आणि ऍशटन टर्नर ऐवजी संधी दिली आहे.
पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मालिकेतील ही आघाडी कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबर साधण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली(कर्णधार), अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, विजय शंकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया – ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टॉयनीस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, नॅथन कुल्टर-नाइल, नॅथन लिऑन, ऍडम झम्पा.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराटचं टेन्शन वाढलं, केन विलियम्सन हा विक्रम मोडयला सज्ज
–दुसऱ्या वनडेसाठी या खेळाडूला मिळणार टीम इंडियातून डच्चू?
–विश्वचषक विजेत्या गौतम गंभीरनेही विश्वचषक २०१९साठी जाहीर केला १६ सदस्यीय संघ






