यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (ICC Champions Trophy 2025) प्रवास उद्यापासून (19 फेब्रुवारी) सुरू होईल. या मेगा स्पर्धेसाठी स्टेज पूर्णपणे सजवण्यात आला आहे. जिथे पहिला सामना बुधवारी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात होईल. पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या या मेगा स्पर्धेसाठी सर्व 8 संघ सज्ज आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांमध्ये काही सर्वोत्तम स्टार खेळाडू आहेत. या स्पर्धेत ज्याप्रमाणे फलंदाज आणि गोलंदाज आपली प्रतिभा दाखविण्यास सज्ज आहेत, त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू देखील यामध्ये विशेष भूमिका बजावणार आहेत. ज्यामध्ये वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू देखील उपस्थित आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भरपूर धावा आणि विकेट्स काढू शकणाऱ्या 3 वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.
1) हार्दिक पंड्या- भारतीय संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठा दावेदार म्हणून प्रवेश करत आहे. मेन इन ब्लूमध्ये प्रचंड ताकद असल्याचे दिसून येते. संघ फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत ताकद दाखवत आहे, ज्यामध्ये स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वेगळा प्रभाव सोडतो. तो गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी फलंदाजी आणि चेंडू दोन्हीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये देखील तो आपली छाप पाडेल.
2) मार्को जॅन्सेन- दक्षिण आफ्रिकेच्या संघात अनेक सामना जिंकणारे खेळाडू आहेत, ज्यामध्ये स्टार अष्टपैलू मार्को जॅन्सन (Marco Jansen) संघासाठी सर्वात मोठा घटक ठरू शकतो. या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंतच्या कारकिर्दीत गरज पडल्यास फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांनाही त्रास देत आहे. अशा परिस्थितीत, जॅन्सेन चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
3) अजमतुल्लाह उमरझाई- अफगाणिस्तानचा संघ यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंडरडॉग म्हणून खेळत आहेत. या संघाचे खेळाडू यावेळी येथे मोठा धमाका करू शकतात. रशीद खान, मोहम्मद नबी आणि रहमानुल्लाह गुरबाज यांच्याबद्दल बरीच चर्चा आहे. पण अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाईकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा अफगाणी वेगवान गोलंदाज अष्टपैलू गेल्या काही काळापासून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपली छाप पाडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर! BCCI कडून मोठी घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास: कशी झाली सुरुवात आणि का खेळतात फक्त आठ संघ?
न्यूझीलंडला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी प्रमुख गोलंदाज बाहेर