इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पाहण्याची मजाच वेगळी असते. कारण, दर्शकांना यामध्ये आपल्या आवडत्या भारतीय आणि परदेशी खेळाडूंना एकमेकांसोबत किंवा एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायची संधी मिळते. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएल सामन्यांमध्ये षटकांची मर्यादा असल्यामुळे फलंदाज दमदार फटकेबाजी करत धावा जमा करतात. तर, गोलंदाज फलंदाजांच्या ताबडतोब खेळीला आडवण्याचा प्रयत्न करत अनेकांना तंबूचा रस्ता दाखवतात.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांविषयी बोलायचं झाले तर, हा विक्रम किंग्स इलेव्हन पंजाबच्या धुरंदर फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. तो आपल्या सर्वाधिक ३२६ षटकारांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर, त्याच्या पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या एबी डिविलियर्सने आपला क्रमांक लावला आहे. तो २१२ षटकारांसह यादीत दूसऱ्या स्थानावर आहे.
या २ परदेशी खेळाडूंनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत क्रमांक लागतो तो भारतीय फलंदाजांचा. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आपल्या २०९ षटकारांसह या यादीत तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या १९४ षटकारांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तर, मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने (१९४ षटकार) पाचवे स्थान पटकावले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत टॉप-५मध्ये असलेले हे सर्व फलंदाज यंदाही षटकारांचा वर्षाव करत आपल्या या आकड्यांमध्ये वाढ करताना दिसतील. पण, वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून बाहेर पडलेला रैना जर पूर्ण हंगामात खेळला नाही. तर, यादीत त्याच्या मागे असणारे फलंदाज त्याच्या पुढे जाऊ शकतात.
या लेखात, आयपीएलच्या तेराव्या हंगामात युएईच्या मैदानावर सर्वाधिक षटकार मारु शकणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात…
आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार मारु शकणारे तीन भारतीय फलंदाज (3 Batsman Who Could Hit Most Sixes In This Ipl Season ) –
हार्दिक पंड्या – मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयपीएलच्या ८व्या हंगामातून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या दमदार फटकेबाजी आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने आयपीएलमध्ये कमी वेळेत अनेक महारथ मिळवले आहेत. तो सहसा मुंबईकडून खालच्या फळीत फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतो.
पंड्याने आतापर्यंत ६६ सामने खेळत ६८ षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे त्याने १०६८ धावांची आपल्या खात्यात नोंद केली आहे. याचा अर्थ असा होतो की, तो आपल्या प्रत्येक आयपीएल सामन्यात कमीत कमी एक तरी षटकार मारतो. पण, आता त्याचा अनुभवात वाढ झाल्यामुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामात नक्कीच यापेक्षा चांगली कामगिरी करेल आणि जबरदस्त षटकारांचा वर्षाव करताना दिसू शकेल.
एमएस धोनी – चेन्नई सुपर किंग्स
नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला एमएस धोनी हा यंदा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)कडून खेळताना दिसणार आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाची आतापर्यंतची आयपीएल कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने आपल्या शानदार हेलिकॉप्टर शॉटने अनेकदा दमदार फलंदाजी प्रदर्शन केले आहे.
जरी धोनी परिस्थितीनुसार फळंदाजी करणारा खेळाडू असला, तरी त्याच्या फटकेबाजीच्या बाबतीत इतरांच्या मागे पडत नाही. आयपीएलमध्ये तो मोठमोठे शॉट्स मारताना दिसतात. आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर तर जगातील यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलच्या तेराव्या हंगामातही धोनी षटकारांचा पाऊस पाडताना दिसू शकतो.
रोहित शर्मा – मुंबई इंडियन्स
आयपीएलच्या पहिल्या सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयपीएल कारकिर्द दमदार कामगिरी केली आहे. हिटमॅन रोहितला त्याच्या शॉट्स मारण्याच्या क्षमतेवरुन हे टोपणनाव देण्यात आले आहे. त्याने आयपीएलमध्ये १८८ सामन्यात १९४ षटकार मारले आहेत.
सहसा रोहित आयपीएल सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसतो. जर त्याने सलामीला फलंदाजी केली तर त्याच्या षटकारांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल आणि तो कदाचित धोनीलाही मागे टाकू शकेल. कारण, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित १५ षटकारांनी धोनीच्या मागे आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
आयपीएल २०२० मधून वेगवेगळ्या कारणाने माघार घेणाऱ्या खेळाडूंची संपुर्ण यादी
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर आयपीएल २०२०चे वेळापत्रक जाहीर, मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने होणार स्पर्धेची सुरुवात
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, आबुधाबीत या सामन्याने होणार स्पर्धेला सुरुवात
चेन्नईला आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर म्हणतोय, ‘ही’ गोष्ट खूपच भारी आहे