---Advertisement---

ताबडतोड फलंदाजी! आपल्या अद्भुत फटकेबाजीने लोकांचे मनोरंजन करणारे ३ फलंदाज

On: शुक्रवार, जून 11, 2021 3:03 AM
---Advertisement---

पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये खेळाडू तंत्रशुद्ध क्रिकेट खेळत असे. परंतु, आताच्या टी-२०च्या युगात तंत्रशुद्ध क्रिकेट खेळण्याबरोबरच फलंदाजांचा आक्रमकतेकडे कल झुकलेला पाहायला मिळतो. आताच्या क्रिकेटमध्ये जास्ती जास्त नियम हे फलंदाजीचा बाजूने देखील केले गेले आहेत. त्यामध्ये ‘पॉवार प्ले क्षेत्ररक्षण’, ‘फ्री हिट’ असे नियम केले गेले. त्यामुळे फलंदाज बिनधास्त खेळी करू लागला आहे. आजच्या ह्या लेखात जाणून घेऊया त्या ३ फलंदाजांबद्दल जे अधुनिक युगात चौफेर फटकेबाजीसाठी ओळखले जातात.

एबी डिविलियर्स
एबी डिविलियर्स ज्याला आपण ‘मिस्टर ३६०’ नावाने ओळखतो. एबी डिविलियर्स मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. त्याला कुठला ही चेंडू कसाही टाकला तरी त्याच्याकडे त्या चेंडूचा फटका तयार असतो. एबी डिविलियर्सने दक्षिण आफ्रिका संघासाठी ११४ कसोटी सामन्यात ५५.६६च्या सरासरीने ८७६५ धावा केल्या आहेत आणि २२८ एकदिवसीय सामन्यात ५३.५०च्या सरासरीने ९५७७ धावा केल्या आहेत. एबी डिविलियर्स आपल्या देशासाठी ७८ टी२० सामने खेळले त्यात त्याने १६७२ धावा केल्या आहे. एबी डिविलियर्स निवृत्त झाला असून आता आयपीएल आणि इत्तर व्यवसायिक लीगमध्ये खेळतो. त्याच्या नावावर वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम आहे.

जॉस बटलर
इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरसुद्धा मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्यात तरबेज आहे. बटलर जेवढे फटके समोर खेळतो तेवढेच फटके याष्टीचा मागे खेळतो. एबी डीविलियर्सनंतर जर कोण असे फटके मारत असेल तर तो जॉस बटलर आहे. इंग्लंड संघाकडून खेळताना जॉस बटलरने १४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात ३८.७ च्या सरासरीने ३८७२ धावा केल्या आणि ११८.७ च्या स्ट्राईक रेटने ९ शतक मारली आहेत. तसेच जॉस बटलरने ७९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत त्यात त्याने ३०.२३च्या सरासरीने १७२३ धावा केल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलिया संघाचा मधल्या फळीतील तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसुद्धा आपल्या फटकेबाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ग्लेन मॅक्सवेल आपल्या फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणात चपळ आहे. ग्लेन मॅक्सवेलचे प्रमुख दोन फटके आहे एक ‘स्वीच हिट’ आणि ‘स्वीप शॉट’ हे शॉट तो प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळतो. ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने ११६ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यात ३४.४ च्या सरासरीने ३८७२ धावा केल्या आणि त्याचा १२५.४चा स्ट्राईक रेट राहिला आहे. तसेच त्याने ५१ गडी सुद्धा बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

फ्रेंच ओपनच्या उपांत्यफेरीत रंगणार ‘हाय-व्होल्टेज’ सामना; नदाल-जोकोविच येणार आमने-सामने

“तेव्हा मी अहंकार बाजूला ठेवला होता” विराट कोहलीची प्रांजळ कबुली

द्रविडची माणुसकी! टॅक्सी सोडून पाकिस्तानी खेळाडूंशी रस्त्यावर चर्चा केली, वाचा ‘त्या’ घटनेबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---