क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात गोलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. एक फलंदाज तुम्हाला एक सामना जिंकवून देऊ शकतो, पण एक गोलंदाज तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकवून देऊ शकतो. स्पर्धा जिंकायची असेल, तर गोलंदाजांना चांगलं प्रदर्शन करावं लागतं.
क्रिकेट इतिहासात काही उत्कृष्ट गोलंदाज होऊन गेले. काही गोलंदाजांनी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच आपली छाप सोडली तर काही गोलंदाजांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षे त्यांच्या निवृत्त होण्याच्या वेळी आली. त्यामुळे त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत क्रिकेटमधून संन्यास घेतला.
या जाणून घेऊया अशा गोलंदाजांबद्दल जे कारकिर्दीतल्या शेवटच्या काही वर्षात यशस्वी ठरले.
३. ख्रिस केर्न्स
ख्रिस केर्न्स (Chris Cairns) न्यूझीलंडचा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. ख्रिस आक्रमक फलंदाज होता तसेच एक उत्कृष्ट गोलंदाज देखील होता. न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो येतो. ख्रिसने १९८० मध्ये पदार्पण केलं, पण खरी शैली त्याची १० वर्षानंतर दिसली.
ख्रिसने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २१८ विकेट्स घेतल्या, पण यातल्या ११५ विकेट्स त्याला त्याच्या शेवटच्या २८ कसोटीत मिळाल्या. ख्रिसने २००४ मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली तसेच २००६ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.
२. जवागल श्रीनाथ
जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) भारताचे उत्कृष्ट जलदगती गोलंदाज होते. त्याने फिरकीपटू गोलंदाजांचा बोलबाला असणाऱ्या भारतीय संघात जलदगती गोलंदाज म्हणून जागा मिळवून आपली प्रतिभा मिळवली. कर्नाटकाच्या (Karnataka) या जलद गोलंदाजाने जवळपास एक दशक भारतीय जलद गोलंदाजीचं नेतृत्व केलं.
श्रीनाथने ६७ कसोटी सामन्यात २३६ विकेट्स घेतल्या. भारताचा मुख्य जलदगती गोलंदाज होण्यासोबतच त्याने कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात उत्तुंग यश प्राप्त केलं. करिअरच्या शेवटच्या ३३ कसोटी सामन्यात ३० पेक्षा कमी सरासरीने ११८ विकेट्स घेतल्या. यात त्याचं एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स म्हणजे १३२ धावा देऊन १३ विकेट्स घेतल्याचं उत्कृष्ट प्रदर्शनसुद्धा समाविष्ट आहे. २००२ मध्ये त्याने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला आणि २००३ मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
१. मिशेल जॉन्सन
या डावखुऱ्या गोलंदाजानी आपल्या गती आणि स्विंगचा वापर करून स्वतःची वेगळी ओळख बनवली. मिशेल जॉन्सनला (Mitchell Johnson) खेळपट्टीतून अनियमित बाऊन्ससुद्धा मिळवण्याची कला अवगत होती. त्यामुळे फलंदाजांना नेहमी त्याच्या गोलंदाजीवर खेळताना कठीण जायचं. जॉन्सनने त्याच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या ३-४ वर्षात जास्त चांगले प्रदर्शन केलं आणि फलंदाजांना त्याच्या समोर खेळणं अजूनच कठीण झालं होतं.
क्वीन्सलँडच्या (Queensland) या खेळाडूने २०१२ ते २०१५ दरम्यान २६ कसोटी सामने खेळून २४ पेक्षा कमी सरासरीने १२३ विकेट्स घेतल्या. जॉन्सनच्या कारकिर्दीमधील अविस्मरणीय सामनासुद्धा यादरम्यानच खेळवला गेला. तेव्हा त्याने स्वतःच इंग्लंड संघाच्या फलंदाजांची पळता भुई थोडी करून ठेवली होती. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की, जॉन्सन त्याच्या कारकिर्दीतल्या शेवटच्या वर्षात जास्ती आक्रमक होता.
महत्त्वाच्या बातम्या –
युवीला घाबरत होता रोहित; म्हणाला, ‘तेव्हा वातावर शाळेप्रमाणे वाटत असायचे’
मार्च महिन्यात ‘हा’ संघ येतोय भारत दौऱ्यावर; पुन्हा मिळणार ‘यंग ब्रिगेड’ला संधी
मिशन वर्ल्डकप! श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी