---Advertisement---

मिशन वर्ल्डकप! श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी

mahela-jayawardene
---Advertisement---

श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने (mahela jaywardene) याला आगामी २०२२ टी-२० विश्वचषकासाठी (2022 t20 world cup) एक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. जयवर्धनेने आतापर्यंत आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससोबत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. आता त्याला पुढच्या वर्षीच्या टी२० विश्वचषकापूर्वी श्रीलंका संघाच्या सल्लागार पदावर नियुक्त केले गेले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डने जयवर्धनेला पुढच्या एक वर्षासाठी सल्लागार पदावर नियुक्त केले. श्रीलंका संघात सध्या युवा खेळाडूंची संख्या जास्त आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. श्रीलंकन संघाचे मागच्या काही वर्षांतील प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक राहिले नाही. संघाच्या प्रदर्शनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने बोर्डने जयवर्धनेसारख्या अनुभवी आणि यशस्वी कारकीर्द घडवलेल्या खेळाडूला सल्लागाराच्या रूपात नियुक्त केले आहे, असे सांगितले गेले.

जयवर्धने पुढच्या वर्षी १ जानेवारीपासून श्रीलंका संघाच्या सल्लागाराच्या रूपात पदभार स्वीकारेल. जयवर्धने श्रीलंकेच्या मुख्य संघासोबतच १९ वर्षाखालील संघासाठी देखील काम करणार आहे. १९ वर्षाखालील संघासाठी देखील तो सल्लागाराचीच भूमिका पार पाडणार आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत जयवर्धनेने अप्रतिम काम केले आहे. २०१७ मध्ये त्याने पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्या वर्षी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्याने २०१९ आणि २०२० मध्ये देखील मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले. याव्यतिरिक्त तो बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टाइटंस आणि द हंड्रेड लीगमध्ये साउथँप्टन संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे.

जयवर्धनेच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने खेळलेल्या १४९ कसोटी सामन्यांमध्ये ३४ शतकांच्या मदतीने ११८१४ धावा केल्या आहेत. तसेच ४४८ वनडे सामन्यांमध्ये १९ शतकांच्या मदतीने १२६५० धावा केल्या आहेत. टी२० मध्ये त्याने ५५ सामने खेळले आणि १४९३ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

थेट रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाल आहे तरी कोण? प्रथम श्रेणीत ठोकलीत २४ शतके

शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “तो माझ्या कार्यकाळातील सर्वात वाईट दिवस”

बिग ब्रेकिंग: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ‘आऊट’; युवा सलामीवीराची लागली लॉटरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---