---Advertisement---

युवीला घाबरत होता रोहित; म्हणाला, ‘तेव्हा वातावर शाळेप्रमाणे वाटत असायचे’

On: मंगळवार, डिसेंबर 14, 2021 9:16 AM
Harbhajan Singh-Rohit-Sharma-Yuvraj-Singh
---Advertisement---

जेव्हा कधी भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) इतिहास लिहिला जाईल, तेव्हा युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन दिग्गजांना त्यामध्ये महत्वाचे स्थान मिळेल. या दोघांनी भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिले. त्यांनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमध्ये अनेक वर्ष एकत्र घालवली आहेत. युवराज रोहित शर्माच्या आधीपासून संघाचा भाग होता. रोहित नंतर संघात सामील झाला. रोहितला जेव्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा युवराज संघातील एक वरिष्ठ खेळाडू होता. त्यावेळी रोहितला ड्रेसिंग रूममधील सुरुवातीचे काही दिवस भीतीदायक वाटत असायचे.

रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यात चांगली मैत्री असल्याचे जगजाहीर आहे. मात्र, जेव्हा रोहित सुरुवातीला भारतीय संघासोबत सहभागी झाला होता, तेव्हा असे नव्हते. मागच्या वर्षी रोहितने या गोष्टीचा खुलासा केला होता की, सुरुवातीला त्याला ड्रेसिंग रूममधील वातावर शाळेप्रमाणे वाटत असायचे. रोहितने सुरेश रैनासोबत इंस्टाग्राम चॅटदरम्यान हा खुलासा केला होता.

तो म्हणाला, “जेव्हा मी संघात सामील झालो, त्यावेळी संघात खूप सारे गंभीर लोक होते. संघातील वातावरण शाळेप्रमाणे होते. आम्ही जास्त बोलू शकत नव्हतो. आम्ही ही गोष्ट करू शकत नव्हतो, आम्ही ती गोष्ट करू शकत नव्हतो.”

रोहित यावेळी बोलताना म्हणाला, “मी युवी पाजीला खूप घाबरायचो. जर आम्ही इकडे तिकडे गोंधळ घातला, तर युवी पा आमच्यावर रागवायचे…’कोण बोलत आहे?'” रोहित पुढे म्हणाला की, जसाजसा वेळ गेला तसा युवी त्याचा जवळचा, सर्वात जास्त सहाय्यक व्यक्ती बनला होता. त्याने असेही सांगितले की, युवराजच्या स्वभावामुळे युवा खेळाडूंना अनुकूल असेल वातावरण मिळाले होते.

“तो नेहमीच खूप सहकार्य करत. पहिले दोन वर्ष त्याच्या खूप जवळ नव्हतो. पण त्यानंतर मला त्याचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्व याची जाणीव झाली. त्यामुळे संघात येणारे युवा खेळाडू, संघाच्या सभोवताली त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत लगेच मिसळले. जर एखादा मुलगा, ज्याला तुम्ही कित्येक वर्षांपासून पाहत आला आहात, जर तुमची मदत करण्यासाठी येत आहे, तर प्रभाव वेगळा असतो,” असे रोहित म्हणाला.

दरम्यान,भारतीय संघासाठी एकत्र खेळण्यासोबतच आयपीएलमध्ये देखील हे दोघे एकत्र खेळले आहेत. आयपीएलच्या २०१९ हंगामात मुंबई इंडियन्सने युवराज सिंगला संघात सामील केले होते आणि त्यावेळी तो रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला होता. रोहित आणि युवराजने एकत्र खेळताना भारतासाठी २००७ टी-२० विश्वचषक आणि मुंबई इंडियन्ससाठी २०१९ आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आयएसएल: एससी ईस्ट बंगालचे पहिल्या विजयाचे स्वप्न केरळा ब्लास्टर्समुळे भंगले

हवेत उडी मारली अन् खाली पडायच्या आत चेंडू मैदानात ढकलला, ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

प्रल्हाद सावंत स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा: मिनी ऑरेंज आणि इलिट ऍथलिट संघाला विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---