ऑस्ट्रेलियात सध्या टी२० लीग, बिग बॅश लीग (बीबीएल, BBL) चा थरार सुरू आहे. या लीगमधील पाचव्या सामन्यात पर्थ स्कॉचर्स आणि ब्रिसबेन हिट (Perth Scorchers vs Brisbane Heat) हे संघ आमने सामने होते. या सामन्यात पर्थ स्कॉचर्सने ६ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान ब्रिस्बेन हिटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅक्स ब्रायंट (Max Bryant) याने अविश्वसनीय क्षेत्ररक्षण कामगिरी (Max Bryant Fielding Efforts) करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ब्रिसबेन हिट संघाने त्याच्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ब्रिसबेन हिटने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, पर्थ स्कॉचर्स संघाच्या एका फलंदाजाने सामन्यादरम्यान हवेत मोठा फटका मारला. यावेळी मॅक्स सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा ठाकला होता. २० षटकांच्या या क्रिकेट सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना संघासाठी एक-एक धाव अडवणे सुद्धा महत्त्वाचे असते. कदाचित हीच गोष्ट डोक्यात ठेवून मॅक्सने क्षेत्ररक्षणात आपले सर्वोत्कृष्ट देण्याचे प्रयत्न केले.
त्याने हा हवेत उंचावरून येणाऱ्या चेंडूला अडवण्यासाठी उंच उडी मारली आणि हवेतूनच त्याने एका हाताने चेंडूला पकडले आणि आपण खाली पडण्यापूर्वी चेंडूला सीमारेषेच्या आत ढकलले. त्यानंतर त्याच्या जवळच क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिलेल्या दुसऱ्या खेळाडूने वेगाने चेंडूकडे धाव घेत खेळपट्टीच्या दिशेने चेंडू फेकत ४ धावांचा बचाव केला.
मॅक्सने ज्याप्रकारे हवेत उडी मारत हा झेल अडवला, ते पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांनी टाळ्या ठोकत त्याचे कौतुक केले. तसेच सामना समालोचकही त्याच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रयत्नांना पाहून चकित झाल्याचे पाहायला मिळाले.
https://www.facebook.com/HeatBBL/videos/304362051525059/?extid=WA-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
असे असले तरीही, ब्रिसबेन हिट संघाला हा सामना जिंकता आला नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉर्चर्सने २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या होत्या. यात कुर्तीस पॅटरसनच्या ३० चेंडूतील ५५ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात पर्थ स्कॉचर्सच्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिसबेन हिट संघ १९.५ षटकात १५१ धावाच करू शकला. परिणामी संघाला ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. ब्रिसबेन हिटकडून सॅम हिज्लेट आणि झॅवियर बार्टलेटने सर्वाधिक ३४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अबब! एकाच दिवसात ‘या’ मोठ्या स्पर्धेत कुटल्या गेल्या तब्बल २५०० धावा
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का
जरा बच के!! हे ३ युवा शिलेदार टीम इंडियात घेऊ शकतात शिखर धवनची जागा