काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ही स्पर्धा कर्णधार म्हणून त्याच्या टी२० कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. त्याच्या ऐवजी रोहित शर्मा याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. टी२० संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता रोहित शर्माला वनडे संघाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. दरम्यान त्याने आर अश्विन बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आर अश्विनला गेल्या काही वर्षांपासून कसोटी संघात नियमित स्थान मिळत आहे. परंतु, त्याला टी२० आणि वनडे संघात गेल्या काही वर्षांत स्थान मिळाले नव्हते. पण २०१६ नंतर पहिल्यांदाच त्याला टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्या टी२० संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर त्याने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून तब्बल ४ वर्षांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते.
रोहित शर्माने बोरीया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आर अश्विन गोलंदाजीमध्ये लवचिकपणा आणतो. ज्याचा वापर पॉवरप्लेच्या षटकांमध्ये करता येतो. तो एक असा अष्टपैलू खेळाडू आहे, जो कुठल्याही परिस्थितीत येऊन गोलंदाजी करू शकतो. त्याच्यासारखा गोलंदाज असणे संघासाठी खूप महत्वाचे आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्हाला एक आयामी गोलंदाज नको आहे, जो फक्त पॉवरप्लेच्या षटकात गोलंदाजी करेल. तो डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकत नाही, फक्त उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करू शकतो किंवा फक्त डाव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करू शकतो. गोलंदाजांना जितके अधिक पर्याय असतील तितके चांगले. माझ्यामते आर अश्विन एक ग्रेट एडिशन आहे.”
डिसेंबर २०२१ मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका भारतीय संघाने १-० ने आपल्या नावावर केली होती. या मालिकेत आर अश्विनने १४ गडी बाद केले होते. ज्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
“नाहीतर ५-० ने ऍशेस गेली समजा”; दिग्गज कर्णधाराचा इंग्लडला निर्वाणीचा इशारा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ दिग्गजांना नाही उंचावता आली रणजी ट्रॉफी
आपला जड्डू जगात भारी! माजी प्रशिक्षकाने केली मुक्तकंठाने प्रशंसा