---Advertisement---

जरा बच के!! हे ३ युवा शिलेदार टीम इंडियात घेऊ शकतात शिखर धवनची जागा

Shikhar-Dhawan
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. काही खेळाडू अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे, तर काही वरिष्ठ खेळाडू साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यापैकीच एक फलंदाज म्हणजे सलामीवीर फलंदाज शिखर धवन.

शिखर धवनने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ०, १२, १४ आणि १८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. त्याच्याऐवजी असे ३ खेळाडू आहेत, जे भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. कोण आहेत ते खेळाडू, चला पाहूया.

१) ऋतुराज गायकवाड : 
या यादीत महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत शतकांची हॅट्रिक केली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील त्याने धावांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्यानंतर झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देखील त्याने २५९ धावा केल्या होत्या. त्यामुळे शिखर धवनच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते.

२) पृथ्वी शॉ :
या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ. गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून बाहेर करण्यात आले होते. परंतु, त्याने आपल्या फलंदाजीवर मेहनत घेतली आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१ मध्ये ८०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

इतकेच नव्हे, तर आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील त्याने अप्रतिम कामगिरी करत ४७९ धावा केल्या. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात शिखर धवनची जागा घेण्यासाठी पृथ्वी शॉ दुसरा सर्वात मोठा दावेदार असेल.

३) शुबमन गिल : 
या यादीत तिसऱ्या स्थानी आहे, युवा फलंदाज शुबमन गिल. तो कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करताना दिसून येतो. त्याला आतापर्यंत फक्त ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेत तो चांगल्याच फॉर्ममध्ये होता. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत ४७८ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो शिखर धवनचे स्थान घेण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

विराटने नेतृत्व सोडल्यावर प्रथमच आली गंभीरची प्रतिक्रिया; सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

आयपीएल २०२२ बाबत बीसीसीआय अध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर

“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---