---Advertisement---

“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”

virat-kohli
---Advertisement---

बीसीसीआयने आगमी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी ८ डिसेंबरला विराट कोहली (virat kohli) कडून वनडे संघाचे कर्णधापद काढून घेतले. रोहित शर्मा (rohit sharma) याच्या रूपात संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. तत्पूर्वी, विराटने टी२० विश्वचषकानंतर स्वतःच्या इच्छेने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. यावेळी मात्र त्याची इच्छा नसताना देखील त्याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले. चाहते बीसीसीआयच्या या निर्णयानंतर नाराज झाले आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (salman butt) देखील या विषयावर व्यक्त झाला आहे.

सलमान बट यांच्या मते बीसीसीआय या मुद्द्याला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते. त्याच्या मते विराट कोहली भारतीय संघासाठी मौल्यवान खेळाडूंपैकी एक आहे. बटने बीसीसीआयच्या या निर्णयानंतर त्याच्या यूट्यूब चॅनवल स्वतःचे मत व्यक्त केले आहे. बट म्हणाला की, “बीसीसीआयची इच्छा नव्हती की विराटने पद सोडावे. (टी-२० विश्वचषकापूर्वी). पाढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असण्याला काही अर्थ नाही. या स्थितीत कोणताच गट नाराज नसता, तर चांगले झाले असते.”

“बोर्डच्या या घोषणेनंतर बातम्या आल्या की, कोहलीला पद सोडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला गेला होता आणि यावरून समजते की, त्याच्याकडे काही अधिकार आहेत. तुम्हाला हे पाहावे लागेल की, त्याने त्याच्या देशासाठी काय केले आहे. त्याला अजून सन्मान द्यायला पाहिजे होता. तुमच्याकडे एका बाजूला तुमचे क्रिकेट बोर्ड आहे आणि दुसऱ्या बाजूला जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे,” असे बट पुढे बोलताना म्हणाला.

बटच्या मते बोर्ड या प्रकरणाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते. तरीही बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे त्याने सांगितले आहे. शेवटी तो म्हणाला की, “तसेही, जे काही झाले, शेवटी ते योग्य झाले आहे, कारण तुमच्याकडे पांढऱ्या चेंडूच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन कर्णधार नसले पाहिजेत.” ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी बट याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांचे उदाहरण देखील दिले.

महत्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर

‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचा ‘जबरा फॅन’ आहे खिलाडी कुमार

‘चांगल्या संघात अनेक नेते नसतात’, विराटला हटवून रोहितला वनडे कर्णधार करण्यामागचे कारण गांगुलीकडून उघड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---