भारतीय खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीदरम्यान किंवा क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर राजकारणाच्या मैदानात उतरणे नवे नाही. गौतम गंभीर, नवज्योत सिंग सिद्धू, मनोज तिवारी असे बरेचसे क्रिकेटपटू आहेत, जे अजूनही राजकारण क्षेत्रात कार्यरत आहेत. याच यादीत आता २ नव्या नावांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे.
रविवार रोजी (१२ डिसेंबर) भारताचा अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. याचवेळी सोशल मीडियावर बड्डे बॉय युवराजसहित त्याचा जवळचा मित्र आणि भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh), हे दोघे लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. (Harbhajan And Yuvraj To Join BJP) यावर आता स्वत: हरभजनने प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या वर्षात पंजाबमध्ये पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Elections 2022) होणार आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘द दिल्ली क्राऊन’ नावाच्या ट्वीटर अकाउंटवर हरभजन आणि युवराजच्या भाजप पक्ष प्रवेशाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग हे पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षात सहभागी होऊ शकतात.’
हे वृत्त वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. त्यामुळे अखेर हरभजनला यावर मौन सोडावे लागले. त्याने ट्वीटवर प्रतिक्रिया देताना हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे.
Fake news https://t.co/nxy81qURPX
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 11, 2021
पंजाब निवडणूकांवेळी हरभजनच्या राजकारणात उतरण्याच्या बातम्या येण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी २०१७ सालीही हरभजन जालंधरमधून पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये उतरणार असल्याची चर्चा झाली होती. परंतु हे वृत्तही पुढे अफवा असल्याचे सिद्ध झाले.
हरभजन घेणार निवृत्ती तर युवराज करणार पुनरागमन
भज्जी म्हणून ओळखला जाणारा हरभजन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत तो क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करेल. त्यानंतर तो काही आयपीएल फ्रँचायझींच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावापैकी एक प्रस्ताव स्वीकारेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे युवराज मात्र आपल्या निवृत्तीतून माघार घेत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्म्यूला वनच्या इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यतीवर रिऍक्ट झाले सचिन, रोहित; पाहा काय म्हणाले?
द. आफ्रिका दौरा: ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर इन, तर १७ शतके झळकावणारा फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर