आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान टीम इंडियामध्ये एक नवीन प्रथेला सुरुवात करण्यात आली. या प्रथेची सुरुवात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक टी. दिलीप यांनी केली होती. विश्वचषकादरम्यान प्रत्येक सामन्यानंतर संघातील खेळाडूला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यात येते. तर द्विपक्षीय मालिकेत मालिकेनंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक निवडले जाते. तर भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेतही ही प्रथा सुरु आहे. यासाठी फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी तीन खेळाडूंना निवडले. मजेदार म्हणजे या तीनही खेळाडूंचे नाव ‘आर’ वरुन सुरु होते. ते म्हणजे रिंकू सिंह, रियान पराग आणि रवी बिश्नोई यांना ‘बेस्ट फिल्डर’ साठी निवडण्यात आले होते. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहाय्यक प्रशिश्रक म्हणून असलेल्या नेदरलँड्सचा माजी क्रिकेटपटु रायन टेन डोशेटने पदक विजेत्याचे नाव घोषित केले.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील सर्वोत्तम श्रेत्ररक्षकाचा पदक रिंकु सिंहने जिंकला. तो मागील काही काळापासून बॅटने काही खास कामगिरी करत नसला तरी रिंकूने आपल्या क्षेत्ररक्षणाने आणि गोलंदाजीने संंघासाठी आपली उणीव भरुन काढला आहे. टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्धची ही टी20 मालिका अनेकदृष्टा खूप खास होती. टी20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर भारतीय संघ या मर्यादित फाॅरमॅटला नव्या पर्वाला सुरुवात करत आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी20 विश्वचषक 2024 च्या यशानंतर भारतीय संघाच्या या तीन महान खेळाडूंनी या फाॅरमॅटला रामराम ठोकला. टी20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर टीम इंडिया 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दाैऱ्यावर गेली होती. या मालिकेसाठी भारतीय संघाला वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आले होते. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिलीच टी20 मालिका होतीय त्यासोबत गाैतम गंभीरने टीम इंडियाचे हेड कोच म्हणून विजयी सुरुवात केली आहे.
???????????????????????????????? ???????????????? ???????????? | ???????????????????????????? ???????? ???????????? ???????????????????????? ????
T20I series win ✅
Any guesses on winner of the fielding medal? ????
Find out ???????? #TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/1gzqQcpmuU
— BCCI (@BCCI) July 31, 2024
हेही वाचा-
टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं, भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड
श्रीलंकेविरुद्ध रिंकू सिंहला 19वा ओव्हर का दिला? कर्णधार सूर्यानं सांगितला ‘मास्टर प्लॅन’!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज मेडल मिळेल का? जाणून घ्या पाचव्या दिवसाचं वेळापत्रक






