क्रिकेट इतिहासात सर्वात अगोदर कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. त्यानंतर वनडे क्रिकेटसारखा मर्यादित षटकांच्या वेगवान क्रिकेट प्रकार नावारुपाला आला. कदाचित, वनडेतील फलंदाजांच्या अफलातून चौकार-षटकारांसह फटाफट बनणाऱ्या धावांमुळे चाहत्यांच्या मनाला कसोटीपेक्षा वनडे क्रिकेट जास्त भावले. तसं पाहिल तर, वनडेमध्ये सुरुवातीला फलंदाजांना शतके करणं थोड कठीण काम असल्याजोग वाटायचं. मात्र, हळूहळू फलंदाजांच्या शैलीत सुधार होत गेली आणि वनडेतही शतके करणारे फलंदाज क्रिकेट इतिहासाला गवसले.
अशात, जेवढे महत्त्व फलंदाजांच्या शतकाला दिले जाते, तेवढेच कर्णधाराच्या शतकालाही दिले जाते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रिकी पांटिंग, विराट कोहली असे अनेक कर्णधार होऊन गेले, ज्यांनी वनडेमध्ये त्यांच्या संघाची कमान सांभाळत असताना शतके ठोकली आहेत. परंतु, असेही काही कर्णधार होऊन गेले ज्यांना त्यांच्या वनडे कारकिर्दीत एकही मारता आले नाही.
या लेखात आपण त्या ३ दिग्गज कर्णधारांच्या आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी वनडेत २०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण, त्यांच्या या धावांमध्ये एकाही शतकाचे योगदान नाही.
वनडेत एकही शतक न मारु शकणारे ३ कर्णधार… 3 Captains Who Never Smashed A Century In Their Entire ODI Career
हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)
हीथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा शानदार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होता. तसं तर, स्ट्रीक गोलंदाजीत जास्त प्रबळ होता. परंतु, त्याची फलंदाजीही कमी मानली जात नव्हती. स्ट्रीकने त्याच्या १२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ४ वर्षे संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, तो एकदाही शतक ठोकू शकला नव्हता. कर्णधारपद सोडून दिल्यानंतर स्ट्रीकला वनडेत शतकी खेळी करण्यात यश आले नव्हते. तो वनडेत सर्वाधिक ७९ धावा करु शकला होता.
विशेष म्हणजे, वनडेत १३ अर्धशतकांसह स्ट्रीकने १८९ सामन्यात २९४८ धावा केल्या होत्या. परंतु, तो वनडेत एक तरी शतक आपल्या नावावर करण्याच्या बाबतीत तो अभागी ठरला.
डेनियल व्हिटोरी (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा धाकड अष्टपैलू क्रिकेटपटू डेनियल व्हिटोरी हा ५ वर्षे आपल्या संघाचा कर्णधार होता. मात्र, हा कर्णधार आपल्या वनडे संघाचे नेतृत्व सांभाळत असताना शतक मारण्यात मात्र अपयशी ठरला. कर्णधार असतानाच्या ५ वर्षांना मिळून एकूण १८ वर्षे वनडेत खेळणारा डेनियल हा २९५ वनडे सामन्यात ४ अर्धशतके करु शकला. परंतु, त्याने केलेल्या एकूण २२५३ धावात एकाही शतकाचा समावेश मात्र तो करु शकला नाही. पण, कसोटीत त्याने ६ शतके केली आहेत.
मिस्बाह-उल-हक (पाकिस्तान)
पाकिस्तानचा खेळाडू मिस्बाह उल हकने आपल्या फलंदाजी शैली आणि चांगला कर्णधार बनण्याच्या आपल्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले होते. आपल्य़ा १३ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत मिस्बाहने ७ वर्षे पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान त्याला या ७ वर्षांत एकही शतक करता आले नव्हते.
शिवाय, त्याने वनडेत कर्णधार असताना आणि फक्त खेळाडू असताना एकूण १६२ सामने खेळले होते. दरम्यान त्याने ४२ अर्धशतकांसह ५१२२ धावा केल्या होत्या. पण, त्याला त्याच्या वनडे कारकिर्दीत एकही शतक करता आले नाही. केवळ ४ धावांनी त्याचे शतक हुलके होते. मिस्बाहने वनडेत सर्वाधिक नाबाद ९६ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
३ असे क्रिकेटपटू; ज्यांचे मैदानावर जखमी होऊन झाले निधन, एक आहे भारतीय
८० पेक्षा जास्त सामने खेळून एकही षटकार मारु न शकलेले ३ भारतीय क्रिकेटर
खणखणीत षटकाराने कारकिर्दीत धावांचे खाते खोलणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय